रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज मध्ये नेहमीच अभ्यासक्रमाबरोबरच भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर घडविण्यासाठी आवश्यक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. कॉमर्समध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींनी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच भविष्यामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी संगणकावर टॅलीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील उच्च शिक्षण हेरोजगार मिळवत पूर्ण करावे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कॉलेजच्या वेळेला जोडूनच रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स च्या माध्यमातून टॅलीचा कोर्स दिला आहे. सरकार मान्य असलेला हा टॅलीचा कोर्स सहा महिन्याचा आहे. सरकारी परीक्षा देऊन हा कोर्स पूर्ण करायचे निश्चित करण्यात आले.टॅलीचे सरकारी प्रमाणपत्र मिळवायचे असे ध्येय निश्चित केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स या संस्थेमध्ये संपूर्ण बॅच मध्ये टॅली कोर्ससाठीजागा शिल्लक होत्या. सर्वच्या सर्वजागा आपल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये कोर्स देऊन पूर्ण केल्या. विद्यार्थिनींनी कॉलेजचा अभ्यास सांभाळून कॉलेजच्या वेळेनंतर रोज एक तास टॅलीच्या कोर्ससाठी जास्तीचा वेळ दिला. २०२४-२५ या वर्षामध्ये आपल्या सरकारमान्य टॅली कोर्सचा १००% निकाल लागला आणि इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेबरोबरच सर्व विद्यार्थिनींनी सरकारमान्य टॅलीचा कोर्स पूर्ण करण्यात यश मिळविले. इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आणि टॅलीचा सरकारमान्य कोर्स करून सुट्टीमध्ये अकाउंटिंग चे काम करण्याचा मानस अनेक विद्यार्थिनींनी बोलून दाखवला.ज्युनिअर कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे उत्पन्न मिळविता मिळविता उच्च शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थिनींनी ठरविले. अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज हे एक वैशिष्ट्यपूर्ण कॉलेज असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकांनी आपल्या मनोगतात सांगितले.