Skip to contentहाऊस सिस्टीम म्हणजे कुलपद्धती.
१९४२ साली ही कुलपद्धती प्रशालेत तत्कालीन मुख्याध्यापक मा.मालशे गुरुजी यांनी स्थापन केली.
सध्या शाळेत ज्योती, भारती, कमल, ज्योत्स्ना, कलिका, तारका, उदय, हंस, सरिता, सुधान्शु, गायत्री, जिजाऊ, राणी लक्ष्मी अशी कुले अस्तित्वात आहेत.
प्रत्येक कुलाला एक ध्येयवाक्य असते.
शाळेतील उपक्रम प्रत्येक कुलाला विभागून दिले जातात.
उपक्रम चांगला होण्यासाठी वेगवेगळ्या वर्गातील विद्यर्थिनी एकत्रित येतात.
मंडळाधिपती,मंडळप्रमुख, कुलप्रमुख अशी रचना कुलपद्धतीची असते.
मंडळाधिपतींची निवडणूक शिक्षक वर्गाकडून होते.
मंडळप्रमुखांची निवडणूक लोकशाही निवडणूक पद्धतीने विद्यर्थिनी मतदान करतात.
कुलप्रमुख निवडणूक शिक्षक वर्गात उमेदवारांची नावे जाहीर करून मतदान घेऊन सर्वाधिक मते मिळविणारी विद्यर्थिनी कुलप्रमुख होते.
शाळेतील वर्षभराचे उपक्रम कुलाद्वारे राबविले जातात.शाळेतील शिस्त, सुव्यवस्था व स्वच्छता राखण्यासाठी कुलपद्धतीमुळे सुलभता आली आहे.
कुलपद्धतीमुळे विद्यर्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.