Skip to content
10 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेमध्ये रेणुका स्वरूप प्रशालेत सचिन पानवलकर अवकाश लॅब केंद्राचे समन्वयक प्राध्यापक विशाल कुंभारे सर यांनी दुर्बिणींच्या माध्यमातून अवकाशाचचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील 40 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.कुंभारे सर यांनी ग्रह व सूर्यमाले विषयी अतिशय सुंदर माहिती विद्यार्थिनींना दिली. तेजस्वी शुक्र ग्रह , गुरु ग्रहावरील कडी व त्याचे चार चंद्र तसेच चंद्र, त्यावरील पृष्ठभाग व खड्डे हे दुर्बीणीच्या माध्यमातून सुस्पष्टपणे दिसले. नयनरम्य अशा सुंदर ग्रहांचा प्रत्यक्ष दुर्बीणीतून पाहण्याचा अनुभव प्रशालेतील शिक्षकांनी देखील घेतला.आकाश निरीक्षणासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळे शुभांगी व सहाय्यक शिक्षिका मानसी पवार, उमा गोंधळेकर, रुपाली शितोळे, धार्मिक चंचला व माजी शिक्षिका सौ. लता त्रंबके उपस्थित होत्या.
अवकाश ज्ञान मिळवण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.