पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) प्रथमच आयोजित IFSC Asian Kids Climbing Championship मध्ये अंडर-१३ गर्ल्स स्पीड क्लायंबिंग कॅटेगरीत ध्रुवीने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने उंचावला! 🥇
✨ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते.
⚡ अशा कठीण स्पर्धेत सुवर्ण जिंकत ध्रुवी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरून आशियाई सुवर्णपदक विजेती पहिली स्पोर्ट क्लायंबर बनली! 🌍🚩
📍 ध्रुवी पुण्यामध्ये राहते आणि गेली चार वर्षे राजे शिवाजी क्लायम्बिंग वॉल, पुणे येथे नियमित सराव करते. सातत्य, जिद्द, शिस्त आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर तिने पुणे आणि महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. 🌄🔥
🎒 ध्रुवी सध्या रेणुका स्वरूप शाळा (सदाशिव पेठ, पुणे), ७ वी इयत्तेत शिकत आहे.
शाळेकडून मिळणारे प्रोत्साहन आणि मूल्ये हे ध्रुवीच्या प्रवासातील महत्त्वाचे बळ ठरले आहे.
मुख्याध्यापिका सौ.कांबळे मॅडम, उप मुख्याध्यापक श्री.जगताप सर आणि सर्व शिक्षकवर्गाच्या सततच्या मार्गदर्शनाने ध्रुवी अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी बनली आहे. 🎓💪


