आंतरराष्ट्रीय योग दिन
रेणुका स्वरूप प्रशालेत २१ जून योग दिन सकाळ व दुपार विभागात साजरा करण्यात आला. सकाळ सत्रातील कार्यक्रमासाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक श्री. श्रीकांत जगताप यांनी प्राणायाम व योगासने यांची प्रात्यक्षिके घेतली. या कार्यक्रमात श्री भालेराव सरांनी योग परंपरा व योगाचे शालेय जीवनातील महत्त्व सांगितले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापिका कांबळे मॅडम यांनी केले ,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.माळी मॅडम व पाहुण्यांचा परिचय श्रीम. शिंदे निर्मला मॅडम यांनी केला.
दुपार सत्रात पतंजली योग समितीचे योग शिक्षक श्री.जयदीप बंदावणे यांनी विद्यार्थिनींच्या वयोगटाला अनुरूप योगासने व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके घेतली. व योगाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका श्रीम.सुनिता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भोकटे सर व अतिथी परिचय श्रीम. सोनवणे सुनिता मॅडम यांनी केला. योग दिनाच्या प्रात्यक्षिकासाठी दोन्ही विभागाच्या एकूण ८०५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
महाकवी कालिदास दिन
दि. 26 जून2025
वार- गुरुवार
स्थळ- रेणुका हाँल
सहभागी- इ. 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थिनी, सौ.सामदेकर, सौ. चौथाई
दि. 26 जून2025 रोजी प्रशालेत महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका मा. गायकवाड मँडम उपस्थित होत्या. कार्यक्रमात इ. 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण केले.
तेजस्विनी जोशी या 10 वी मधील विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.
टि.म.वि. संस्कृत परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमांसाठी सौ.सामदेकर व सौ.चौथाई यांनी मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमा
दिनांक 10 जुलै 2025
वार . - गुरुवार
कुल -- कलिका
कार्यक्रम - गुरुपौर्णिमा
कलिका कुलातील वर्ग - दहावी गुलाब व आठवी जाई
वर्गशिक्षक --- सौ. संजीवनी खैरमोडे , सौ.मानसी पवार
आज दुपार विभागात कलिका कुला तर्फे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम सादर करण्यात आला. माननीय मुख्याध्यापिका सौ. शुभांगी कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. गायकवाड सुनीता व पर्यवेक्षक श्री. जगताप सर यांनी गुरुवर्य महर्षी व्यासऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व शिक्षक, मंडळ प्रमुख विद्यार्थिनी,कुलप्रमुख विद्यार्थिनी यांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले.विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालोपयोगी भेटवस्तू कुलामार्फत देण्यात आली.
अशा रीतीने दुपार विभागात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.
रक्षाबंधन
8ऑगस्ट 2025
रक्षाबंधन निमित्त रेणुका स्वरूप प्रशालेत ज्योती कुल सहभागी वर्ग 10 केवडा ,6 अबोली यांनी शाळेतील झाडांसाठी रंगीबेरंगी कागद ,मणी ,कार्डशिट वापरून eco-friendly राख्या बनवल्या. मा.मुख्याध्यापिका कांबळे बाई यांनी झाडांना राखी बांधली.इतर विद्यार्थिनींना रक्षाबंधनाची माहिती वर्गवाणी वरून सांगण्यात आली.
या निमित्ताने 10वी केवडा व 6वी अबोलीतील काही विद्यार्थिनींनी विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आपल्या पोलिस अधिकाऱ्यांना राखी बांधली .या कार्यक्रमासाठी मा . उपमुख्याध्यापक जगताप सर यांनी मार्गदर्शन केले.
श्रीमती रायरीकर स्वाती
सौ.पवार प्रज्ञा
ज्ञानरंजन वर्गाचे उदघाटन
शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी यावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या इयत्ता 5वी च्या ज्ञानरंजन वर्गाचे उदघाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी माध्यमाच्या शाळेतील मुले परकीय भाषा शिकण्यामध्ये सुद्धा कमी पडू नयेत तसेच इंग्रजी भाषेवरही त्यांना प्रभुत्व मिळवता यावे या उद्देशाने या वर्गाची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या शाला समितीच्या अध्यक्षा माननीय आनंदी ताई पाटील व प्रशालेचा शाला समितीच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे मॅडम उपस्थित होत्या.
रेणुका स्वरूप प्रशालेत अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन
ए आय च्या युगात ज्ञानाइतकेच कौशल्य महत्त्वाचे आहे . Nothing is impossible. हे उद्गार आहेत टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह संस्थापक माननीय श्री विवेक भिडे यांचे.आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून रेणुका स्वरूप प्रशालेत कै. गोविंदराव भिडे संगणक कक्ष उभारण्यात आला. या अद्ययावत कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. "संगणक प्रयोगशाळा हा एक दृष्टिकोन आहे ज्याद्वारे आपल्या विद्यार्थिनी पुढील काळातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम होणार आहेत. विद्यार्थिनींना आत्मनिर्भर करणे हे आपले उद्दिष्ट आहे" याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले ( निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
माननीय शाला समितीच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाला समितीच्या महामात्रा डॉक्टर मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. माननीय उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम आणि माननीय पर्यवेक्षक जगताप सर यांचे उत्तम नियोजन लाभले.
पालखी सोहळा
रेणुका स्वरूप शाळेमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला.
विठ्ठल- रुक्मिणी , वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थिनी, विठूचा गजर करत दिंडीत सामील झाल्या होत्या. माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम माननीय उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम आणि पर्यवेक्षक जगताप सर हे देखील सोहळ्याला उपस्थित होते.
क्रांति दिन
दिनांक – 08-08-2025
वार – शुक्रवार
कूल – गायत्री
सहभागी वर्ग – 9 वी कमळ आणि 10 वी जाई
वेळ – दुपारी 12.30
स्थळ – भावे प्राथमिक सभागृह
प्रशालेत शुक्रवार दिनांक 08-08-2025 रोजी क्रांतिदिन साजरा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सामदेकर बाईच्या श्लोक गायनाने झाली.यांनतर मा.उपमुख्याध्यापक श्री.जगताप सर व प्रमुख पाहूणे श्री.नागेश पाटील यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले.
कु.सानवी मोरे व इतर विद्यार्थीनिनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारीत पोवाडा सादर केला. 9 वी कमळमधील विद्यार्थिनीनी विविध क्रांतीकारकांच्या व्यक्तिरेखा सादर केल्या.यानंतर प्रमुख पाहूणे श्री.नागेश पाटील यांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांविषयी माहिती सांगितली..सौ.सामदेकर बाईनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर सौ भोसले बाईनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री .जगताप सर यांनी मार्गदर्शन केले.
सौ.भोसले. सौ. सामदेकर
गोकुळाष्टमी
14 ऑगस्ट गोकुळाष्टमी
पारंपरिक सणांचा उत्साह विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी प्रशालेमध्ये आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्योत्स्ना कुल सहभागी वर्ग 8 गुलाब व 9 केवडा या वर्गांतर्फे हा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोकुळाष्टमी सणाची माहिती सांगण्यात आली.त्यानंतर "श्रीकृष्ण कलियुगात आल्यावर तो काय संदेश देईल" या संकल्पनेवर आधारित एक प्रभावी नाट्य सादर करण्यात आले.नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली.सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्वांच्या उत्सुकता शिगेला पोहोचवणारा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. शुभांगी कांबळे मॅडम व उपमुख्याध्यापक श्री.जगताप सर या कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन हा पारंपारिक सोहळा उत्साहात साजरा केला.
सौ.माळी रत्नमाला
सौ.बाजारे मनीषा
**रेणुका स्वरूप प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.*
२९ ऑगस्ट हॉकीचे जादूगर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कौशल्य व्यायाम मानसशास्त्रात पीएचडी करणारे चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. उपाध्याय कुमार कृष्णानंद हे उपस्थित होते. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
वृंदा पेशवे या विद्यार्थिनीने विद्यार्थिनींना हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी विषयी माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींना सूर्यनमस्कार , सायकलिंग खेळाची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे स्वतःसाठी मैदानात खेळा, खेळताना आनंद मिळतो. डार्विन चा सिद्धांत विद्यार्थिनींना समजावून सांगितला. मार्गदर्शन करत असताना त्यांनी विद्यार्थिनींचे बैठे खेळ घेतले. ऑलिंपिक विषयी माहिती विद्यार्थिनींना सांगितली. खेळामध्ये अभ्यास आला पाहिजे. न्यूटनचा नियम, गुरुत्वाकर्षण, घर्षण, भूगोल विषयातील दिशा मैदानावर शिकवल्या पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती त्यांनी विद्यार्थिनींना सांगितली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. जयसिंग जगताप यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका सौ निर्मला शिंदे मॅडम यांनी केले.
रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा..
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, पुणे व म .ए.सो. रेणुका स्वरूप हायस्कूल ,पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर( पूर्व/ पश्चिम )अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला.
तालुकास्तरावर आधारित या मेळाव्यात पुणे शहरातील सुमारे 96 शाळांनी सहभाग नोंदवला होता.
'कॉन्टम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने'-या विषयावर आधारित सहा मिनिटांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. याच विषयावर वीस प्रश्नांची बहुपर्यायी लेखी परीक्षा झाली तसेच याच विषयावर परीक्षकांनी तीन प्रश्न विचारले. अशाप्रकारे शंभर पैकी गुणदान केले गेले.
पूर्व व पश्चिम विभाग यातून प्रत्येकी तीन क्रमांक देण्यात आले व यातील पहिल्या दोन क्रमांकाचे जिल्हास्तरावर सादरीकरण पुढे केले जाणार आहे. सुयोग्य आठ परीक्षकांनी परीक्षणाचे काम केले.
या विज्ञान मेळाव्याप्रसंगी माननीय श्री विराज खराटे उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक विभाग) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
""भविष्याकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने अशाप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवला" असे श्री. खराटे यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. चेतन महाजन तसेच पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री रोहिदास एकाड याप्रसंगी उपस्थित होते.
रेणुका स्वरूप प्रशालेचे माननीय उपमुख्याध्यापक श्री. जगताप सर तसेच पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शास्त्र विभागाच्या सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला.
हिंदी दिन
दिनांक : 15 /9 /2025
वार : सोमवार
स्थळ : भावे प्राथमिक हॉल
दिनांक 14 सप्टेंबर रोजी रविवार ची सुट्टी असल्यामुळे हिंदी दिनाचा कार्यक्रम 15 सप्टेंबर 2025 रोजी भावे प्राथमिक हॉलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर उपस्थित होते. हिंदी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थिनींनी हिंदी दिनाचे महत्त्व ,हिंदी दिनाची प्रतिज्ञा ,हिंदी साहित्यिक कवी यांची रचना यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थिनींनी हिंदी पहेलिया घेतल्या. शाळेतील माननीय पर्यवेक्षक अनासपुरे सर यांनी हिंदी दिनानिमित्त विद्यार्थिनींना केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच आपल्याला हिंदी व इंग्रजी भाषा बोलता आलीच पाहिजे. आपण रोजच्या व्यवहारात तिचा वापर करावा. असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला. विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये स्टेम रोबोटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी स्टेम रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी SCERT संचालिका श्रीमती कमलादेवी आवटे तसेच स्टेम संस्थेचे मोनिका वालिया ,विक्रम पुराणिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे यांनी केले व महामात्रा डॉक्टर मानसी भाटे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. रोबोटिक्स हा विषय सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता बनकर व मनीषा साळुंखे मॅडम ने केले. कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री जयसिंग जगताप सर व पर्यवेक्षक श्री मनोज अनासपुरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
भाषा पुनव करंडक - बक्षीस समारंभ उत्साहात साजरा
सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल येथे भाषा पुनव करंडक - आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला . प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध अनुवादिका श्रीमती पौर्णिमा कुंडेटकर यांच्या प्रेरणेने व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या द्वितीय वर्षी 30 शाळांमधील १२० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता .
म. ए . सो . च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती आनंदी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे व उपमुख्याध्यापक श्रीयुत जयसिंग जगताप उपस्थित होते . प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींच्या वक्तृत्वांचे सादरीकरण होऊन विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .
स्पर्धतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे -
१) बालगट - इ . ३री, ४ थी
कु. दातार ओवी संकेत
( नवीन मराठी शाळा )
२) लहान गट - इ. ५वी, ६वी
कु. अस्मी मोहम्मद रफिक शेख
( रामचंद्र राठी विद्यालय )
3) मध्यम गट - इ . ७ वी, ८ वी
कु. राधिका ढवळे
(रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल)
४ ) मोठा गट - इ .९वी, १०वी (विभागून )
कु . भावना जितेंद्र चौधरी
( सेंट फ्रान्सिस हायस्कूल )
कु. शुभ्रा चिंतामणी याळगी
( अहिल्यादेवी हायस्कूल )
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती अहवाल
दिनांक:- 1/10/2025
वार:- बुधवार
स्थळ:- रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल
उद्दिष्ट्ये :- 1) विद्यार्थिनींमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती देणे.
2) विद्यार्थिनींमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन मूल्यांविषयी जाणीव जागृती करणे
दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने 1ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेचे पर्यवेक्षक मा. अनासपुरे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता 7वी तील कु. खोटे जानवी व इयत्ता 6 वी तील कुमारी मानसी आमडेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली.
शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी च्या सर्व विद्यार्थिनींनी स्वच्छता केली. विद्यार्थिनींनी सर्व वर्ग खोल्या, व्हरांडे, मैदान, मुख्याध्यापिका कक्ष, पर्यवेक्षक कक्ष, कचेरी, गायन वर्ग, संगणक वर्ग, शिक्षिका खोली या सर्व खोल्यांची शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता केली.
गांधी जयंती निमित्त शालेय व शाळाबाह्य परिसर स्वच्छता
दिनांक:- 2/10/2025
वार:- बुधवार
स्थळ:- शाळा व नृसिंह मंदिर सदाशिव पेठ
उद्दिष्ट्ये :- 1) विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणे.
2) विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व स्वच्छतेची आवड निर्माण करणे
दिनांक 2ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने 1ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी शाळेमध्ये स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणे व स्वच्छतेची आवड निर्माण करणे हा दृष्टीकोन समोर ठेवून प्रशालेने या उपक्रमाचे आयोजन केले .विद्यार्थिनींनी स्वच्छते संदर्भात घोषवाक्ये तयार केली . शालेय परिसरात सदाशिव पेठेत स्वच्छता फेरी काढण्यात आली. त्यात विद्यार्थिनींनी स्वच्छते संदर्भात फलक तयार केले. स्वच्छता फेरी अंतर्गत परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वच्छता फलकांचा वापर केला. परिसर स्वच्छतेअंतर्गत प्रशालेजवळील नृसिंह मंदिरामध्ये इयत्ता 7वी गुलाब व कमळ च्या विद्यार्थिनींनी स्वच्छता केली.
शाळेमध्येही इयत्ता 5वी ते 7वी च्या सर्व विद्यार्थिनींनी स्वच्छता केली. विद्यार्थिनींनी सर्व वर्ग खोल्या, व्हरांडे, मैदान, मुख्याध्यापिका कक्ष, पर्यवेक्षक कक्ष, कचेरी, गायन वर्ग, संगणक वर्ग, शिक्षिका खोली या सर्व खोल्यांची शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता केली.या उपक्रमाचे नियाजन व मार्गदर्शनशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळेबाई , उपमुख्याध्यापक श्री. जगताप सर , पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर व स्वच्छता समितीतील शिक्षकांनी केले.
चिमुकल्यांच्या जल्लोषात रेणुका क्रीडा करंडकाचे वितरण
म.ए.सो.रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल आणि म.ए.सो. क्रीडावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रेणुका क्रीडा करंडक स्पर्धेत प्राथमिक विभागात रैम्लर र.पु.परांपजे शाळा हुजूरपागाने सर्वसाधारण विजेतेपद तर माध्यमिक विभागात एच. एच. सी.पी. हुजूरपागा,लक्ष्मी रोड आणि विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यम या शाळांनी विभागून सर्वसाधारण विजेतेपद पटकावत पहिल्या रेणुका क्रीडा करंडकावर आपली मोहर उमटवली. विजेत्या संघांनी केलेला जल्लोष आणि स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी केलेल्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे स्पर्धेतून जोपासल्या गेलेल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन झाले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. हेमंत रासने यांच्या हस्ते आज शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 या दिवशी करण्यात आले. म.ए.सो. रेणुका स्वरूप प्रशालेचे माजी विद्यार्थिनी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खो खो खेळाडू सौ.अश्विनी बिपिन पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या रेणुका क्रीडा करंडक स्पर्धेत लंगडी, कबड्डी आणि डॉजबॉल या सांघिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पुण्यातील 25 शाळांमधील 36 संघांमधील 950 विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवत पहिल्या वर्षी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक 12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत म.ए.सो. रेणुका स्वरूप प्रशालेच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. विशेष म्हणजे या प्रशालेच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग न घेता स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले.
वार्षिक स्नेहसंमेलन
दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व गणेश वंदने ने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका श्रीमती कावेरी गायकवाड मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माधुरीताई पटवर्धन साठे या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
रेणुका स्वरूप प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
रेणुका स्वरूप प्रशालेच्या प्रांगणात रेणुका स्वरूप हायस्कूल, भावे प्राथमिक, पूर्व प्राथमिक, रेणुका करिअर कोर्स असा रेणुका परिवारातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
वीर पत्नी श्रीमती दिपाली विजय मोरे, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राध्यापिका श्रीमती प्रणिता जोगळेकर, मा. उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग श्रीमती छाया महिंद्रकर तसेच रेणुका स्वरूप चे मा. उपमुख्याध्यापक जयसिंग जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी रेणुका परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ध्वजगीत, राज्य गीत, ध्वज प्रतिज्ञा, समूहगीत सादर केले गेले. प्रात्यक्षिकांमध्ये घोषवादन, वंद्य वंदे मातरम या गीतावरील कवायत, देशभक्तीपर पंजाबी लोक नृत्य यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
विद्यार्थिनींना साक्षरतेची, कॉपीमुक्त परीक्षांची शपथ दिली गेली. क्रांतिकारक व महिला समाज सुधारक या विषयावर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
घोषवादनाच्या तालावर एनसीसी कॅडेट्सनी मानवंदना दिली. एनसीसी कॅडेट्स ना रँक प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र कन्या क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचे रांगोळीतून व्यक्तिचित्र श्रीमती यशोदिनी कुलकर्णी यांनी रेखाटले होते त्यांच्या माहितीचे प्रदर्शन भरवले गेले.
वीरपत्नी श्रीमती दिपाली विजय मोरे यांच्या शौर्य गाथेने सारेच भारावून गेले. मा. प्रणिता जोगळेकर तसेच मा.छाया महिंद्रकर यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अशाप्रकारे स्फूर्तीदायक आणि भरगच्च कार्यक्रमांनी ओतप्रोत भरलेला असा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मा. उपमुख्याध्यापक श्री. जगताप सर आणि पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कला --क्रीडा दिन अहवाल 2025- 26
दिनांक ----18 फेब्रुवारी 2026
वार -----बुधवार
स्थळ ---भावे प्राथमिक सभागृह
कार्यक्रमाचे उद्दिष्टे--- प्रशालेतील विद्यार्थिनींनी कला आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश याचे कौतुक करणे त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देणे.
प्रशालेत 18 फेब्रुवारी 2026 रोजी कला क्रीडा दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांनी केले. वर्षभर विविध स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्व स्तरांवर कला आणि क्रीडा या क्षेत्रात विद्यार्थिनी सहभागी होतात उत्तम यश मिळवतात त्यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले.
आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी श्रीमती पल्लवी गंडाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच या यशामागे त्यांचे कोचेस व शिक्षक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. माननीय प्रमुख पाहुण्या श्रीमती पल्लवी गंडाळे यांनी विद्यार्थिनींना खेळाचे महत्व स्पष्ट करून सांगितले. खेळामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते ,आत्मविश्वास वाढतो ,वेळेचे उत्तम नियोजन करता येते. यासंदर्भात त्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती माळी मॅडम यांनी केले बक्षीस यादी वाचनाचे कार्य प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती निर्मला शिंदे मॅडम व श्रीमती चंचला धार्मिक मॅडम यांनी केले. प्रशालेतील उत्तम खेळाडू म्हणून बक्षीस पात्र विद्यार्थिनी कुमारी ध्वजा जैन हिला प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका सोनवणे मॅडम यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले. प्रशालेचे माननीय उपमुख्याध्यापक श्री जयसिंग जगताप सर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री अनासपुरे सर व माननीय मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाने कार्यक्रम अतिशय वेळेत व उत्तमरीत्या पार पडला.
रेणुका स्वरूप प्रशालेत महिलादिन उत्साहात साजरा
""महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे शरीर आणि मन दोन्हीही आनंदी ठेवावे."
महिला दिनाचे औचित्य साधून आपले विचार प्रकट केले शाळेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रोफेसर डॉक्टर अनघा जोशी यांनी. या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू असून क्रिकेट रणजी करंडक खेळाडू आहेत .
शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर महिला वर्गाचे या निमित्ताने शाळेतील पुरुष शिक्षक शिक्षकेतर वर्गाने कार्यक्रमाचे सर्व नियोजन करून पुष्प व पेन देऊन आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. पर्यवेक्षक श्री अनासपुरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. उपमुख्याध्यापक श्री जगताप सर यांनी केले.
सूत्रसंचालन श्री वाळके सर यांनी केले.
अशाप्रकारे अतिशय उत्साहात महिला दिनाचा कार्यक्रम प्रशालेत साजरा झाला.




















































































