व्हिजन, मिशन, उद्दिष्टे

व्हिजन:-

राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधून जीवन कौशल्य रुजविणे व पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणे.

मिशन:-

1) विद्यार्थिनींचा बौद्धिक,भावनिक,शारीरिक विकास साधण्यासाठी अनुभवाधिष्ठीत पद्धतीतून शिक्षण देणे.
2) विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समन्वयातून पर्यावरणाचे संवर्धन करणे.

ध्येयवाक्य :-

सबला अहं बहुबलधारिणी!

उद्दिष्टे:-

  • विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व कौशल्य,सर्जनशीलता,उद्यमशीलता व पर्यावरणीय जाणीव इ.गुणांचा विकास करणे.

  • अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ज्ञानरचनावादाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.

  • शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे.

  • शालेय पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या समन्वयातून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे.

  • वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ माजी विद्यार्थिनींचा सहभाग प्रशालेच्या व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी करून घेणे.