म.ए.सो. विषयी

founders-of-mes

ज्ञानतेजाचा विस्तार करून संपूर्ण जग प्रकाशमान करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया जिथे एकशे पन्नासपेक्षाही आधिक वर्षांपासुन निरंतर सुरु आहे, अशी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी.
कै. न.र. महागांवकारांच्या वर्गामुळे १८६० साली प्रज्वलित झालेली आणि कै.बापूसाहेब भाजेकर यांनी तेवत ठेवलेली ही ज्ञानाजोत पुढे कै.वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी हातात घेतली. सन १८७४ मध्ये ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने परिचित झालेली ही संस्था सन १९२२ पासून’ ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नावाने विकसित होत गेली.
पुणे शहर, पुणे जिल्यात कासार आंबोली, सासवड, बारामती, नवी मुंबई परिसरात पनवेल, बेलापूर, कळंबोली, सातारा जिल्ह्यात शिरवळ आणि रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे घाणेखुंट तसेच अहमदनगर येथे संस्थेचा कार्यविस्तार झाला आहे.
संपन्न परंपरेचा वारसा सांभाळत, काळाशी सुसंगत असे बदल करत, संस्थेची वाटचाल चालू आहे .म्हणूनच, म.ए.सो. आज ७७ शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केजी ते पीजी शिक्षण देते. इतकेच नव्हे तर इतर विषयांमध्ये संशोधन करण्याच्या संधीही येथे उपलब्ध आहेत.
शिक्षण क्षेत्रात सातत्याने वंचितांसाठी केलल्या कार्याची दखल घेत , संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेन्द्र फडणवीस ह्यांच्या हस्ते १८ ऑगस्ट २०१६ रोजी देण्यात आला. तसेच आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार संस्थेच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला सन २०१५ -१६ व सन २०१६-१७ ह्या वर्षासाठी देण्यात आला.
MES Alumni Association ह्या नावाने महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचा एकत्रित असा माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहे. त्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमासंबाधी सर्व माहिती www.mespune.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.