डिजिटल वर्गखोल्या

कालानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अध्यापनासाठी वापर करता यावा यासाठी रेणुका स्वरूप प्रशालेतील सर्व 22 खोल्यांमध्ये संगणक, प्रोजेक्टर व स्क्रीन उपलब्ध आहेत. डिजिटल पद्धतीने अध्यापन करण्यासाठी व्हिडीओज, पॉवर पॉईंट यांचा वापर केला जातो. विद्यार्थीनी वर्गात स्वतः उत्तम प्रकारे संगणक, प्रोजेक्टर हाताळतात. इय्यता 5 वी साठी विद्यार्थिनींच्या लहान वयाचा विचार करून अभ्यास मनोरंजक वाटावा व अभ्यास कंटाळवाणा वाटू नये यासाठी आकर्षक चित्र, गमतीशीर Animation वापरून तयार केलेली विषयानुसार डिजिटल पाठांचे सॉफ्टवेअर देखील उपलब्ध आहे. सेमी इंग्रजी चे धडे त्यामुळे मुलींना अवघड न वाटता विषयाची गोडी वाटते. प्रशालेतील शिक्षक तंत्रस्नेही असून स्वतः तयार केलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या साहाय्याने पाठ घेतात.
प्रशालेतील सर्व अहवाल त्यामुळे डिजिटल स्वरूपातच तयार केले जातात. विज्ञानातील कित्येक संकल्पना केवळ पारंपारिक पध्दतीने शिकवले तर ते संबोध स्पष्ट होत नाहीत अशा वेळी तांत्रिक पद्धतीने ते प्रशालेत शिकवल्यामूळे प्रभावी अध्ययन- अध्यापन होते.