शैक्षणिक

रेणुका स्वरूप प्रशाला ही खाजगी अनुदानित फक्त मुलींची शाळा आहे. या प्रशालेत इ. ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थिनी शिक्षण घेतात.

या प्रशालेत इ.५ वी ते १२ वी साठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C  Board) चा अभ्यासक्रम राबविला जातो. प्रशालेत एकूण १९७५ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्षानुवर्षे प्रशालेच्या इ.१० वी, १२ वी च्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा आजही टिकून आहे.

इ. ५ वी वी ते १० वी साठी सेमी इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम तर इ. ११ वी व १२ वी साठी वाणिज्य (Commerce) शाखेचे इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. तज्ञ व अनुभवी शिक्षक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतात. प्रशालेमध्ये कृतियुक्त अध्यापन , दृक-श्राव्य माध्यम(Digital Classroom), प्रयोग, प्रश्नमंजुषा अशा विविध माध्यमातून अध्ययन-अध्यापन केले जाते. याचा उपयोग करून विद्यार्थिनी स्कॉलरशिप , MTS, NTS यासारख्या बाह्यपरीक्षा, वक्तृत्व-निबंध स्पर्धा, Inspire Award, विज्ञान प्रदर्शन इ. मध्ये सहभागी होतात.

याचबरोबर प्रशालेमध्ये थलसेनेचे NCC पथक कार्यरत आहे. प्रशालेचे घोष पथक प्रशालेची शान आहे. तसेच गौरवशाली अशा कुलपद्धतीद्वारे अनेक शालेय उपक्रम राबवले जातात. त्यामुळे गुणवंत व यशवंत विद्यार्थिनी निर्माण करण्याच्या कार्याची परंपरा आजतागायत चालू आहे.