मर्सिडीज बेंझ कंपनीतर्फे आपल्या प्रशालेत रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे, तसेच मुलींच्या स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांची पहाणी करण्यासाठी मिस बर्जित स्पार्क (मॅनेजर- मर्सिडीज बेंझ जर्मनी)यांनी आज प्रशालेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांसोबत नूतनीकरण बाबत संवाद साधला.
रेणुका स्वरूप प्रशालेत अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन
ए आय च्या युगात ज्ञानाइतकेच कौशल्य महत्त्वाचे आहे . Nothing is impossible. हे उद्गार आहेत टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह संस्थापक माननीय श्री विवेक भिडे यांचे.आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून रेणुका स्वरूप प्रशालेत कै. गोविंदराव भिडे संगणक कक्ष उभारण्यात आला. या अद्ययावत कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “संगणक प्रयोगशाळा हा एक दृष्टिकोन आहे ज्याद्वारे आपल्या विद्यार्थिनी पुढील काळातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम होणार आहेत. विद्यार्थिनींना आत्मनिर्भर करणे हे आपले उद्दिष्ट आहे” याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले ( निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
माननीय शाला समितीच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाला समितीच्या महामात्रा डॉक्टर मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. माननीय उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम आणि माननीय पर्यवेक्षक जगताप सर यांचे उत्तम नियोजन लाभले.