सध्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही २४ सप्टेंबर १८७४ या दिवशी ‘पूना नेटिव इन्स्टिट्यूशन’ या नावाने सुरु झालेली मुलांची पहिली शाळा होय.
संस्थेचे जनक कै.वामन प्रभाकर भावे यांच्या नावाने या शाळेस भावे स्कूल या नावाने संबोधले जाऊ लागले. १९२६ साली या शाळेत मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ही शाळा “मुलींचे भावे स्कूल” या नावाने ओळखली जाऊ लागली.
१९३५ साली “मुलींचे भावे स्कूल” सध्याच्या जागेवर स्थलांतरीत झाले. १९७०मध्ये मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती भरत स्वरूप यांनी आपली स्वर्गवासी कन्या रेणुका स्वरूप हिच्या स्मरणार्थ या शाळेस उदारहस्ते देणगी दिली आणि शाळा “म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल” या नावाने ओळखली जाऊ लागली.
१९३५ साली ३५० विद्यार्थिनी या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज मितीस इ.५वी ते १२वी. पर्यत १,९६९ मुली शिक्षण घेत आहेत. “सबला अहं बहुबलधारिणी” या शाळेच्या ध्येयवाक्यास कटिबध्द राहून शाळा प्रगतीपथावर वाटचाल करत पुण्याचे भूषण ठरत आहे.