शालेय उपक्रम २०२४-२०२५
परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट
मर्सिडीज बेंझ कंपनीतर्फे आपल्या प्रशालेत रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे, तसेच मुलींच्या स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांची पहाणी करण्यासाठी मिस बर्जित स्पार्क (मॅनेजर- मर्सिडीज बेंझ जर्मनी)यांनी आज प्रशालेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांसोबत नूतनीकरण बाबत संवाद साधला.
रेणुका स्मृती दिन
दि. 10 जुलै 2024 रोजी प्रशालेत रेणुका स्मृति दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी मा.मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे ,उपमुख्याध्यापिका सविता हिले ,पर्यवेक्षिका सुनिता गायकवाड, दोन्ही विभागातील मंडळाधिपती, शिक्षक , सेवक आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्व.रेणुकेच्या मूर्तीचे पूजन मा.कांबळे मॅडम यांनी केले. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका निवेदिता मेहेंदळे यांनी रेणुकेची माहिती सर्वांना सांगितली.
पालखी सोहळा
दिनांक १३/७/२४ शनिवार
कुल कमळ
सहभागी वर्ग( १० केवडा ,८ जाई)
वारकरी संप्रदाय आपणास समता, बंधुभाव ,एकात्मता शिकवतो.
संपूर्ण महाराष्ट्रात अध्यात्म आणि चैतन्याचा झरा वारी मुळे वाहतो.आनंदी वातावरणात विद्यार्थिनी या वारीत सहभागी झाल्या. मा.मुख्य.कांबळे बाईंनी आपली शाळा हे पंढरपूर असून तुम्ही सर्व विद्यार्थिनी वारकरी आहात. तुमचे आई वडील ,शिक्षक हे विठोबा रुक्मिणी मानून तुम्ही शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा असा मोलाचा सल्ला या कार्यक्रमाची सांगता करताना दिला.
मंडळ प्रमुख निवडणूक
आज दि. 11 जुलै रोजी प्रशालेत इ. 7 वी ते 10 च्या मंडळ प्रमुख पदासाठी निवडणूक पार पडली.मा .मुख्यध्यापिका कांबळे मँडम यांचे हस्ते उद्घाटन झाले. इ. 5 वी ते 10 वी मधील सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने मतदान प्रक्रिया समजावून घेतली व मतदान केले. मा. मुख्याध्यापिका कांबळे मँडम व पर्यवेक्षिका गायकवाड मँडम तसेच शिक्षकांनी सुद्धा मतदान
केले.
गुरुपौर्णिमा
शनिवार दिनांक 20 -07-24 रोजी प्रशालेत गुरूपौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कलिका कुलाने सादर केला. यात 10 वी अबोली व 9 वी जाई हे वर्ग सहभागी होते. यावेळी विद्यार्थीनींनी काव्य, नृत्य व नाटक सादर केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम, पर्यवेक्षिका सौ.गायकवाड मॅडम व पर्यवेक्षक श्री. जगताप सर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम यांनी गुरू- शिष्य परंपरेविषयी माहिती देऊन विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.
रेणुका स्वरूप प्रशालेत गुणगौरव समारोह संपन्न
सोमवार, दिनांक २२ जुलै २०२४ रोजी रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सन २०२३- २४ मधील इयत्ता १० वी व १२ वी तील यशस्वी विद्यार्थिनींचा ' गुणगौरव समारोह ' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी माननीय डॉ . मानसी गोडबोले - घारपुरे उपस्थित होत्या . तसेच भावे प्राथमिक शाळेच्या महामात्रा माननीय श्रीमती मैत्रेयी देसाई व रेणुका स्वरूप प्रशालेच्या महामात्रा माननीय डॉ . मानसी भाटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
पारितोषिक वितरणानंतर प्रमुख अतिथी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला . सध्याच्या माहिती - तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक माध्यमांचा वापर सजगतेने करा, भविष्यात यशस्वी होण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवून समाज - ऋणाची जाणीव सतत मनात ठेवा व त्यादृष्टीने कार्य करा, असा मोलाचा संदेश डॉ. मानसी गोडबोले यांनी विद्यार्थिनींना दिला .
टिळक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
१ ऑगस्ट टिळक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भावे प्राथमिक हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला.या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती तेजश्री बाभूळगावकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग ओघवत्या भाषेत रंजकतेने मुलींसमोर सादर केले. माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थिनींचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बाबुळगावकर ,प्रशालेचे पर्यवेक्षक जगताप सर ,पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम , यांच्या हस्ते विजेत्या मुलींचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
गुरुवार दिनांक 01-08-2024 रोजी Rotary Club of Pune Metro यांच्याकडून विद्यार्थीनींसाठी Self Defence (स्व - संरक्षण ) याविषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऊदघाटन करण्यात आले. यावेळी Rotary Club of Pune Metro च्या पदाधिकारी यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले तसेच टाकाऊतून टिकाऊ पद्धतीने तयार करण्यात आलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रशालेतील 9 वी केवडा व 9 वी जाई हे वर्ग सहभागी होते.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी कांबळे मॅडम यांनी स्व- संरक्षणाचे महत्व विद्यार्थीनींना सांगितले व प्रशालेत हे प्रशिक्षण राबविण्यात येणार असल्याने Rotary Club च्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.
रोटरी क्लब पूना वेस्ट तर्फे इंटरॅक्ट क्लब उद्घाटन समारंभ
आज रोटरी क्लब पुना वेस्ट तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींसाठी प्रशालेमध्ये इंटरॅक्ट क्लब उद्घाटन समारंभ करण्यात आला .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटेरीयन बलवीर चावला उपस्थित होते .तसेच रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट चे प्रेसिडेंट निरंजन माथूर सर संचालक हरेंद्र देशपांडे रोटेरियन चिपळूणकर ,बिपिन घाटे ,माधुरीताई घाटे ,सुनिता धानोरकर ,माधवी गोखले ,नेहा ओक, गौरी देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम व शाला पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये आठवीच्या वर्गातील इंटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट सेक्रेटरी व सदस्य म्हणून विद्यार्थिनींची निवड करून त्यांना बॅचेस देण्यात आले इंटरॅक्ट म्हणजे काय रोटरी क्लबचे कार्य काय आहे विद्यार्थिनींनी कोणते प्रकल्प घ्यायचे आहे यामुळे त्यांचे काय फायदे होणार आहे प्रकल्प काय आहेत त्यावर विद्यार्थिनींनी काय करायचे आहे या विषयावर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर युथ रोटेरियन बलवीर चावला सर व रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट चे प्रेसिडेंट माथूर सर यांनी विद्यार्थिनींबरोबर संवाद साधला. शाळेच्या प्रेसिडेंट म्हणून झालेल्या ध्वजा जैन विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. सेक्रेटरी झालेल्या चैत्राली गांगुल विद्यार्थ्यांनीने रोटरी क्लबचे आभार मानले.
रक्षाबंधन कार्यक्रम
आज दि. 17 ऑगस्ट रोजी प्रशालेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता दहावी गुलाब व आठवी कमळ या कुलातर्फे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कुमारी भाग्यश्री पुजारी या विद्यार्थिनीने रक्षाबंधन सणाची माहिती व त्याचे महत्त्व सर्वांना सांगितले यावेळी विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या या प्रशालेतील विविध वृक्षांना बांधण्यात आल्या तसेच इयत्ता आठवी कमळ मधील विद्यार्थिनी मुलांचे भावे हायस्कूल या प्रशालेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या इयत्ता दहावी गुलाब मधील पंधरा विद्यार्थिनी व श्री. माळी सर व सौ. भोगे मॅडम यांनी जनता सहकारी बँक बाजीराव रोड पुणे या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कॉमर्स डे
आज गुरुवार, दिनांक २२/०८/२४ ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवसीय कॉमर्स डे कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यानिमित्त प्राध्यापिका श्रीमती श्वेता कुलकर्णी यांचे कॉमर्स आणि उद्योजकता या विषयावर इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थीनींसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कॉमर्स च्या विद्यार्थिनींनी उद्योजक व्हावे आणि त्यासाठी पूर्वतयारी कशी करावी तसेच यशस्वी उद्योजकांची उदाहरणे देऊन विषय मांडणी केली. विद्यार्थिनींच्या मनात यानिमित्ताने उद्योजकतेचे बीजारोपण झाल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी मा. मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे मॅडम उपस्थित होत्या. इयत्ता १२वी अबोली मधील समीक्षा राऊत हिने उपस्थितांचे स्वागत, परिचय करून आभार मानले.
रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये सचिन पानवलकर अवकाश निरीक्षण केंद्र उद्घाटन सोहळा संपन्न.
शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये सचिन पानवलकर अवकाश निरीक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. विद्यार्थिनींमध्ये शालेय जीवनापासूनच अवकाश तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी व या क्षेत्राकडे त्यांनी भविष्यात करियर म्हणून पहावे या उद्देशाने प्रशालेच्या माझी विद्यार्थिनी मा. श्रीमती जया पानवलकर यांच्या आर्थिक मदतीतून हे केंद्र निर्माण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती जया पानवलकर व श्री प्रमोद पानवलकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा व शाळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी ताई पाटील,प्रशालेच्या महामात्रा डॉक्टर मानसी भाटे, श्री अजय पुरोहित , ग्लोबल मिशन एस्ट्रोलॉजी चे समन्वयक प्राध्यापक विशाल कुंभारे सर तसेच प्रशालेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती शुभांगी कांबळे यांनी केले व सूत्रसंचालन श्रीमती मानसी पवार मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्रीमती उमा गोंधळेकर यांनी केले.
इ . १० वी शुभेच्छा समारंभ
दिनांक 30/1/25 गुरुवार रोजी दुपारी 3.30ते 4.45 या वेळेमध्ये इयत्ता 10 वी चा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. कुलकर्णी श्रद्धा यांनी सूत्र संचालन केले.पर्यवेक्षिका गायकवाड सुनीता यांनी प्रास्ताविक केले. मा.मुख्य.कांबळे शुभांगी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षकवृंदातून मली गुरप्पा यांनी मनोगत व्यक्त केले.बोर्ड परीक्षेच्या बाबतीत सूचना सामदेकर मुग्धा यांनी दिल्या.
विद्यार्थीनींनी भावुक होत मनोगत व्यक्त केले..
संमिश्र भावनेत शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
बालिका दिन
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3 जानेवारी रोजी बालिका दिन प्रशालेत साजरा करण्यात आला. इयत्ता नववी अबोली व इयत्ता सहावी अबोली या दोन्ही वर्गांच्या 'सुधांशु' कुला तर्फे हा दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित पोवाडा, नाटक, मर्दानी खेळ व नृत्य सादर करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी कांबळे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांनी ज्या उद्देशाने सर्व मुलींना शिक्षणाची शिदोरी दिली तो मूळ उद्देश जाणून आपलं ध्येय निश्चित करा व ते मिळवण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. पर्यवेक्षक सौ. गायकवाड सुनिता यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले .इयत्ता पाचवी ते आठवी चे सर्व वर्ग यामध्ये उपस्थित होते.
माजी विद्यार्थिनी दिन व तिळगूळ समारंभ
म. ए . सो . रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी माजी विद्यार्थिनी दिन व तिळगूळ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला . प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनी व शिक्षक यांना माजी विद्यार्थिनी संघातर्फे पारितोषिके देण्यात आली . मा. वि . संघातर्फे शालेय विकासकामासाठी निधी सुपूर्त करण्यात आला .
मा.वि. संघाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य व त्यांचे सहकारी यांनी याप्रसंगी गाणी बहिणाईची हा बहारदार संगीतमय कार्यक्रम सादर केला . कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्य माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या . तिळगूळ वाटप व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली .
मराठी राजभाषा दिन
आज दि. 28 फेब्रुवारी 2025 वार - शुक्रवार प्रशालेत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आबासाहेब गारवारेच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा तोडमल या उपस्थित होत्या. या प्रसंगी ज्या मुलींनी,शिक्षकांनी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. कांबळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी मुलींनी गणेश वंदना, नृत्य, एकांकिका सादर केली.
प्रमुख पाहुण्यांनी मुलींना मार्गदर्शन करताना खूप मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे योग्य वेळी योग्य नियोजन करा, सतत प्रयत्न करा, वाचन सराव करा.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका,पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी व्यवस्थित रित्या पार पाडले. या कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले.
विज्ञान दिन
दिनांक 28 फेब्रुवारी 2025 शुक्रवार रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना विज्ञान दिनाची माहिती व थोर भारतीय वैज्ञानिक शांती स्वरूप भटनागर यांची माहिती या कार्यक्रमांमध्ये देण्यात आली.आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ सायन्स येथील हेड ऑफ डिपार्टमेंट प्रो.निर्भय पिंपळे यांच्या मार्गदर्शनातून T.Y.Bsc. च्या चार विद्यार्थिनींनी यावेळेस प्राण्यांवर आधारित माहितीपट दाखवला.तसेच अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखायची याविषयी प्रत्यक्ष प्रयोगातून मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका गायकवाड सुनिता मॅडम यांनी केले.