सहशालेय उपक्रम

परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट

मर्सिडीज बेंझ कंपनीतर्फे आपल्या प्रशालेत रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे, तसेच मुलींच्या स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांची पहाणी करण्यासाठी मिस बर्जित स्पार्क (मॅनेजर- मर्सिडीज बेंझ जर्मनी)यांनी आज प्रशालेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनी  व शिक्षकांसोबत नूतनीकरण बाबत संवाद साधला.

राजश्री शाहू महाराज जयंती 

                २६ जून राजश्री शाहू महाराज जयंती प्रशालेत उत्साहात साजरी झाली. ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्ती कायदा केला. व डॉ. बाबासाहेबांना उच्च शिक्षणात मदत केली, अशा त्यांच्या योगदानामुळे समाजाला नवी दिशा मिळाली. आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थिनींना समजावून दिला. माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी व विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

                   

रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन 

विविध उपक्रमाद्वारे साजरा

               रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळ व दुपार या दोन्ही विभागात उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षक श्री. बंदावणे सौ.नाटेकर यांनी योग प्राणायाम यांचे प्रात्यक्षिकासह महत्त्व सांगितले.

 या निमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

योग समाजामध्ये रुजावा म्हणून प्रशालेच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरातून योग जनजागृती रॅली काढली. एन.सी.सी. व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली तसेच योगाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे शुभांगी, उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम, पर्यवेक्षक श्री. जगताप सर,पर्यवेक्षिका श्रीम. गायकवाड यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

रेणुका स्वरूप प्रशालेच्या नवीन स्कूलबस ची उत्साहात सुरुवात 

                                      

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ 

रेणुका स्वरूप प्रशालेत विद्यार्थिनींचे जोरदार स्वागत 

*रेणुका स्वरूप माध्यमिक विभाग एसएससी निकाल २०२४

Appeared:- ३४१

Pass:- ३३९

Fail:- ०२

Distinction:-९२

First class:-११८

Second class:-१०७

Pass class:-२२

Total pass percentage:- ९९.४१%

 

*रेणुका स्वरूप हायस्कूल SSC बोर्ड २०२४शाळेतून प्रथम पाच क्रमांक*

1) जान्हवी जयंत कांबळे – ९६%

2) लोहोकरे नंदिनी श्रीरंग – ९४.८०%

3) शिंदे कीर्ती नितीन –   ९३.२०%

4) मुजुमले नंदिनी राजेंद्र – ९२.८०%

5) पानसरे साक्षी संदीप – ९२.२०%

 सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन 💐💐

इयत्ता १२ वी निकाल १०० %

इयत्ता १२ वी अबोली मधील प्रथम तीन क्रमांक
इयत्ता १२ वी गुलाब मधील प्रथम तीन क्रमांक

रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभाग निकाल २०२४                                                                         (इयत्ता १२ वी वाणिज्य शाखा)

Appeared:- १३०
Pass:- १३०
Fail:- ००
Distinction:-१९
First class:-५०
Second class:-५४
Pass class:-०७
Total pass percentage:- १००%

विज्ञान दिन

                       28 फेब्रुवारी रोजी आपल्या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमा पूजनानंतर ईशस्तवन व विज्ञान गीत मुलींनी सादर केले. विज्ञान दिनानिमित्त घेतलेल्या रांगोळी, निबंध व वक्तृत्व स्पर्धांमधील बक्षिसपात्र विद्यार्थिनींचे कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे श्री देवराम कांबळे सर, पर्यवेक्षक सौ. सुनीता गायकवाड बाई व श्री. जयसिंग जगताप सर या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व बक्षिस देवून कौतुक करण्यात आले. विज्ञानातील संकल्पना समजण्यासाठी   अनेक छोटे प्रयोग श्री देवराम कांबळे सरांनी मुलींसमोर सादर केले. अनेक विद्यार्थिनींचा यात कृतियुक्त सहभाग देखील होता. गाणी, पोवाडे अशा माध्यमातून सरांनी उत्तम  मार्गदर्शन केले.

रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ,पुणे.*

            वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन २०२३ -२४

दिनांक २२ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रशालेमध्ये मुख्य पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कला ,क्रीडा आणि अभ्यासामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रशाले कडून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर वैशाली श्रीनिवास जोशी (खरे) या लाभल्या होत्या. “ध्येय निश्चिती व ध्येयप्राप्तीसाठी जिद्द चिकाटी, मेहनत करून ते मिळवण्याचे कौशल्य व गुण विकसित होण्याचे श्रेय मी रेणुका स्वरूप प्रशालेल्या देते” या शब्दात त्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.                    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. श्रीनिवास भालचंद्र जोशी उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मग. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, पर्यवेक्षिका श्रीमती सुनीता गायकवाड आणि श्री जयसिंग जगताप यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूपाली शितोळे यांनी केले तर श्रीमती मनीषा साळुंखे यांनी मान्यवरांचे आभार मानले.                     सदर स्नेहसंमेलन सप्ताहात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात क्रीडा स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, अभंग स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,दीपोत्सवानिमित्त मैदानी स्पर्धा, सांघिक स्पर्धा ,पालकांच्या डिश डेकोरेशन आणि संगीत खुर्ची स्पर्धा ,मिस रेणुका स्पर्धा इत्यादींचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या पालकांचे व विद्यार्थिनींचे कौतुक प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम व त्यानंतर “वंदे मातरम” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

               

२६ जानेवारी  

 शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४, रेणुका स्वरूप प्रशालेच्या प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी चिंचवड विभागातील पोलीस कॉन्स्टेबल कुमारी साक्षी भागवत माने, या तर अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या माननीय महामात्रा डॉक्टर मानसी भाटे उपस्थित होत्या. प्रशालेच्या मा .मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक मॅडम, भावे प्राथमिक प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा गायकवाड, पूर्व प्राथमिक प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती मेधा दाते, रेणुका स्वरूप करिअर इन्स्टिट्यूटच्या समन्वयक श्रीमती सारिका वाघ, रेणुका स्वरूप प्रशालेच्या मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, भावे प्राथमिक प्रशालेच्या मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती वृषाली ठकार, रेणुका स्वरूपचे मा. पर्यवेक्षक श्री.जगताप सर, श्रीमती.सुनिता गायकवाड, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री. अरविंद पाटील, उपसचिव राजेशगायकवाड , ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पलता लाड, श्रीमती पुष्पलता मोरे, श्रीमती सुरेखा शिंदे, श्रीमती मीना
साळवी, आणि ज्येष्ठ सेवक श्री. मनोहर डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजास व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.यामध्ये प्रशालेच्या एनसीसी विभाग, घोष पथक, स्काऊट गाईड, आर एस पी,कुलप्रमुख इत्यादी पथके सहभागी होती.या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबन व स्वसंरक्षण, आई-वडिलांचा मान आणि सक्षम बनण्याचा सल्ला विद्यार्थिनींना दिला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी देशाचा अभिमान व मान सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले. या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका अनिता नाईक मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमतीमनीषा साळुंके यांनी केले.कार्यक्रमाची सांगता विविध प्रात्यक्षिक सादरीकरणाने मोठ्या उत्साहात झाली.

                                                         

 शाळेचा अभिमान 

                   दिनांक २६  जानेवारी ते २९  जानेवारी२०२४  दरम्यान जमशेदपूर येथे ओपन नॅशनल टाटा स्टील स्पोर्ट क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२४ संपन्न झाली.या स्पर्धेत एकूण चार देशांचा सहभाग होता 

भारत, नेपाळ ,कझाकिस्तान,उझबेकिस्तान. या स्पर्धेत एकूण २८५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

ही स्पर्धा एकूण तीन प्रकारात खेळली गेली होती १. लीड क्लाइंबिंग..२ . स्पीड क्लाइंबिंग ..३. बोर्डरिंग

                 दिनांक २८ जानेवारी रोजी झालेल्या लीड क्लाइंबिंग या स्पर्धेमध्ये ध्रुवीने  पहिले सुवर्णपदक मिळवले..व बोल्डरिंग या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक मिळवले.दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या स्पीड क्लाइंबिंग या खेळ प्रकारात ध्रुवीने तिसरे सुवर्णपदक मिळवले.

                 ध्रुवी छत्रपती शिवाजीनगर पुणे येथे स्पोर्ट्स क्लाइंबिंग या खेळाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने दररोज मांतू मंत्री, अमोल जोगदंड, इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

                                                       

 

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात मा. पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना… ऑनलाईन कार्यक्रमात आपल्या रेणुका स्वरूप च्या इयत्ता 12 वी च्या विद्यार्थिनी मा. पंतप्रधान चे मार्गदर्शन ऐकताना… 

               

   

माजी विद्यार्थिनी मेळावा – सन २०२३-२४          

         

                   दरवर्षीप्रमाणे शनिवार दि. १३जानेवारी २०२४ रोजी ..सो च्या रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये  माजी विद्यार्थिनी  मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे विविध क्षेत्रांतील गुणवंत आजीमाजी विद्यार्थिनींचा सत्कार तिळगूळ समारंभ. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कर्तबगार पर्यटनव्यवस्थापिका श्रीमती पायल जाखडेजोशी तसेच अध्यक्षा डॉ.माधवी वैद्य, संस्थेचे प्रशालेचे सन्माननीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

                    डॉ.वैजयंती खानविलकर, डॉ.लीली जोशी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती लीला कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती उषा साने, इत्यादी मान्यवर माजी विद्यार्थिनीही आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य, कला, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी माजी विद्यार्थिनी, .१०वी१२वीतील तसेच स्कॉलशि परीक्षांमधील उत्कृष्ट यशप्राप्त विद्यार्थिनींना माजी विद्यार्थिनी संघातर्फे पारितोषिके स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली.

                 दोनशेहून अधिक माजी विद्यार्थिनींनी या मेळाव्यात सहभाग घेतला. श्रीमती स्वाती टकले, श्रीमती अंजली म्हेत्रे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त करून शालेय गतस्मृतींना उजाळा दे शालामातेविषयीचा स्नेहभाव व्यक्त केला.

                 माजी विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आभारप्रदर्शन केले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व सध्याच्या शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी श्लोकगायन व स्वागत, श्रीमती मधुरा चौथाई यांनी बक्षिसयादी-वाचन व श्रीमती निवेदिता मेहेंदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यानिमित्ताने  माजी  विद्यार्थिनी संघात‌र्फे प्रशालेस उपयुक्त भेटवस्तू देण्यात आली. आभारप्रदर्शन, तिळगूळवाटप व कॉफीपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सुयश

मंगळवार  दिनांक 5/12/23 या दिवशी हुजूरपागा येथे इयत्ता 5 वी ते 7वी गटात हुजूरपागा करंडक लंगडी  स्पर्धेत आपल्या शाळेने उपविजेतेपद पटकाविले.

                                 

दिनांक 8 डिसेंबर रोजी हुजूरपागा प्रशालेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या हुजूरपागा  क्रीडा करंडक स्पर्धेत थ्रो बॉल मध्ये रेणुका स्वरूप मधील   इ. 8 वी ते 10 वी या गटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.

                             

शाळेचा वाचन प्रेरणा दिन 

                      हा कार्यक्रम 16 ऑक्टोबर2023 सोमवार या दिवशी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  सरस्वती स्तवनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.पूजा जोग मॅडम यांनी केले .

या कार्यक्रमांमध्ये भाषिक उत्क्रांती याला अनुसरून प्रथम संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या क्रमाने सर्व भाषांमधील ग्रंथ परिचय,पुस्तक परीक्षण, उतारे सादर करणे , कथाकथन,कविता सादर करणे, यासारखे कार्यक्रम विद्यार्थिनींनी भाषा विषयाच्या शिक्षकांच्या मदतीने सादर केले. यामध्ये ज्ञानेश्वरी शिर्के, जान्हवी कांबळे,प्रेरणा लाळे, आकांक्षा म्हस्के, निकिता जवळी शिवानी भारती, आद्या पडवळ, तेजस्विनी जोशी, सानिका आगावणे, ऋतुजा आंबेडे या विद्यार्थिनींचा सहभाग होता.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मा. सविता हिले मॅडम,मा.पर्यवेक्षिका प्रज्ञा देशपांडे,सुनिता गायकवाड,यांनी केले मालती आदमाने यांनी पुस्तक वाचन केले व सूत्रसंचालन निवेदिता मेहेंदळे यांनी केले सौ.लाड पुष्पलता यांनी केलेले पुस्तक परीक्षण सुध्दा मेहेंदळे यांनी वाचले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रशालेतील ग्रंथालयात सर्व इयत्तांसाठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले.त्याचाही लाभ सर्व प्रशालेतील विद्यार्थिनींनी घेतला.

गोकुळाष्टमी

            रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवार दिनांक 5
सप्टेंबर 2023 रोजी दुपारी विभागातील ज्योत्स्ना कुलातर्फे 10 वी चाफा व 5 वी अबोली या
वर्गांनी व सकाळ विभागातील हस कुलातर्फे 7 वी चाफा व 5 वी केवडा या वर्गांनी
गोकुळाष्टमी निमित्त पुस्तक हंडीचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमा दरम्यान इयत्ता
5वी, 7वी व 10 वी या वर्गातील गोपिकांनी कृष्णाच्या विविध लीलांचे नृत्य सादर केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पूजा जोग मॅडम यांनी मुलींचे उद्बोधन केले. त्यांनी
आपल्या उदबोधनात विद्यार्थिनींना वाचन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी
सांगितले. या प्रसंगी 7 वी चाफा मधील आदिती ढाकणे व 5 वी केवडा मधील स्वराली
जरांडे या विद्यार्थिनींनी ”दहीहंडीचे महत्त्व”या विषयावर माहिती सांगितली. पुस्तक हांडी
फोडून या कार्यक्रमाची सांगता झाली. समाजात गरीब – श्रीमंत ही असणारी दरी कमी
करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण काला करीत त्यांची ही शिकवण विद्यार्थिनीन पर्यंत
पोहोचवण्यासाठी इयत्ता 5वी ते 10वी च्या सर्व वर्गामध्ये वर्ग शिक्षकांच्या मदतीने
गोपाळकाला करण्यात आला. सर्व विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

अध्यापक प्रबोधिनी व्याख्यान 

 पुष्प दुसरे

 शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास

                    रेणुका स्वरूप प्रशालेतील सभागृहामध्ये मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 या दिवशी  ‘शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मानसशास्त्रज्ञ श्रीमती. स्वप्ना असेरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानामध्ये शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्याच्या हेतूने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, शिक्षकांमधील कौशल्य अद्ययावत करण्याकरिता,विविध कलागुणांनी युक्त व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध समस्या देऊन त्यावर विचार व गटानुसार चर्चा, खेळाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्याकरिता आवश्यक व्यक्तिमत्त्व स्तंभ, विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीमध्ये उपयुक्त ठरणारे कौशल्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.सशक्त व्यक्तिमत्त्व व संस्कारक्षम   विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांना येणाऱ्या समस्या याबाबत श्रीमती स्वप्ना असेरकर यांनी शिक्षकांचे शंका समाधान केले.या व्याख्यानामुळे शिक्षकांमधील कौशल्य अद्ययावत होण्यास मदत झाली.

                     

गणेशोत्सव

               दरवर्षीप्रमाणे 2023-24 या वर्षी सुद्धा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप परिवारातर्फे ‘गणेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.गणेश  चतुर्थीच्या दिवशी गणेशाची स्थापना करण्यासाठी सर्व विभागांचे पदाधिकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

         दररोज सकाळ संध्याकाळ आरती,नैवैद्य,अथर्वशीर्ष पठण,प्रसाद अशा पारंपारिक पद्धतीने गणेशाची आराधना करण्यात आली.या निमित्ताने या उत्सवाचा उद्देश व भारतीय संस्कृती याची माहिती विद्यार्थिनींना सांगण्यात आली.पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंडळाने घेतलेल्या सार्वजनिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमात विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

      गणेश विसर्जनाच्या दिवशी घोष पथकाचे वादन व मिरवणूक यामध्येदेखील सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. फुलांनी सजावट करून श्रीगणेश मूर्तीची मिरवणूक टिळक रोड मार्गाने वाजत गाजत काढण्यात आली.शाळेच्या मैदानावर अत्यंत भक्तिभावाने आरती व प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले.

                                                     

दिनांक १२/९/२३,मंगळवार.

वेळ दुपारी ३.२५ ते ४.३०.

रेणुका हॉल

व्याख्यान विषय – पालखेड ची लढाई

व्याख्याते- श्री.जगन्नाथ लडकत

                     इतिहास अभ्यासक श्री लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या ४० लढाया, मुघल कसे घाबरले त्याचे वर्णन, आणि राधाबाई यांचा मुलगा, चिमाजी अप्पांचा भाऊ , कुटुंबीयांचा प्रमुख म्हणून केलेली कर्तव्ये असा जीवनपट सांगितला.विद्यार्थिनींना योद्धा बाजीराव यांची माहिती आवडली.

                 प्रशालेचे पदाधिकारी मा. मुख्या.जोग बाई, पर्यवेक्षिका देशपांडे बाई आणि गायकवाड बाई आणि शिक्षक तसेच ९ वी अबोली,गुलाब या वर्गाच्या विद्यार्थिनी यासाठी उपस्थित होते.

व्यासपीठावर पालखेड  युद्ध स्मारक समिती  संस्थापक सदस्य श्री.प्रशांत गोऱ्हे,श्री.हेमंत तांबोळकर , सहजीवन व्याख्यान मालेचे आयोजक श्री.विनय कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी केले.

              

रक्षाबंधन*

                     रेणुका स्वरूप प्रशालेत सरिता कुल (सकाळ विभाग )व ज्योती कुल (दुपार विभाग ) यांच्यातर्फे रक्षाबंधनाचा सण सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.

                    सरिता कुलाने प्रशालेतील सेवक बंधू – भगिनींना, पेरूगेट पोलिस चौकीतील पोलिस रक्षकांना तसेच पेरूगेट भावे हायस्कूलमधील विद्यार्थी बांधवाना स्नेहाचे प्रतीक म्हणून राख्या बांधल्या व पथनाट्य सादर केले.

                   राष्ट्रप्रेम, निसर्गप्रेम व बंधुप्रेमाच्या संस्काराची जोपासना व्हावी या उद्देशाने ज्योती कुलाने प्रशालेतील वृक्षांना स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या बांधल्या. रक्षाबंधनाविषयी पौराणिक, ऐतिहासिक माहिती सांगितली .                                                   

९ ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन

             रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये बुधवार दिनांक ९ ऑगस्ट 2023 रोजी क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळ विभागातील इतिहास विभाग व दुपार विभागातील गायत्री कुलातर्फे  कार्यक्रम सादर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्री. अनिकेत यादव हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावरील कथा प्रत्यक्ष चित्रांद्वारे विदयार्थिनींना सांगितल्या. मा. उपमुख्याध्यापिका सविता हिले यानी क्रांतिदिनाची माहिती सांगितली. 5वी ते 7वी च्या विद्यार्थिनींनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून विविध स्वगते सादर केली.

              लोकमान्य टिळक व क्रांतिकारक यांच्यावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला.आदिवासांचा सन्मान करणे व  त्यांच्यासमोरील आव्हाने ओळखणे या हेतूने ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका पूजा जोग, उपमुख्याध्यापिका मा. सविता हिले ,पर्यवेक्षिका प्रज्ञा देशपांडे व  सुनीता गायकवाड उपस्थित होत्या. सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री राजेंद्र कांबळे, सौ. विद्या पालकर , सौ. बनकर सुनीता, सौ. अनिता दळवी ,सौ. कानडे, सौ. कांबळे रत्नमाला यांनी केले.

अध्यापक प्रबोधिनी व्याख्यान- प्रथम पुष्प

विषय:-बालिका विकास व पालक संवाद

                     शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट २०२३ या दिवशी सकाळी ११.१५ ते १२.३० या वेळेत रेणुका सभागृहामध्ये अध्यापक प्रबोधिनी तर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ‘बालिका विकास व पालक संवाद’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यासाठी श्री.राजेंद्र वालेकर रा.स्व.संघ पुणे महानगर कुटुंब प्रबोधन गतिविधी प्रमुख लाभले होते. सदर व्याख्यानामध्ये टीव्ही, सोशल मीडिया, जाहिरात इ.मुळे तसेच उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने अर्थार्जन करणाऱ्या पालकांच्या व्यस्ततेमुळे विद्यार्थिनी व पालक यांच्यामध्ये कमी होत जाणारा संवाद व त्याचे दुष्परिणाम इ. समस्यांवर सकारात्मक उपाय कसा शोधावा, शिक्षकांनी पालक सभा किंवा वैयक्तिक पालक भेट या माध्यमातून पालकांशी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

                   पालकांशी संवाद साधत असताना शिक्षकांना कोणत्या समस्या येतात, याबाबत श्री. वालेकर सरांनी शिक्षकांचे शंका समाधान केले. अध्यापन प्रबोधिनी अंतर्गत झालेल्या या व्याख्यानामधून सर्व शिक्षकांना सकारात्मक ऊर्जा मिळाली.

                    

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन

              मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०२३रोजी रेणुका स्वरूप प्रशालेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी कर्नल राज शेखर हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती प्रज्ञा देशपांडे या होत्या, या कार्यक्रमासाठी म. ए. सो. चे कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, प्रशालेच्या महामात्रा श्रीमती चित्रा नगरकर, करिअर कोर्सच्या समन्वयक श्रीमती सारिका वाघ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले पर्यवेक्षिका श्रीमती सुनिता गायकवाड हे सर्वजण उपस्थित होते.

             कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.प्रशालेतील N. C. C. पथक, RSP पथक, घोष पथक, गर्ल गाईड पथक, कुलप्रमुख पथक यांच्या मार्फत राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच  इ.५ वी ते इ.७ वी च्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. या हस्तलिखितांमध्ये शालेय विषयांबद्दल माहिती दिली आहे व चित्र संकलित करण्यात आली आहेत. १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या.

             याप्रसंगी माननीय माजी कर्नल राजशेखर यांनी “भविष्य में दुनिया को आगे बढ़ाने वाला एक भारतीय ही होगा और उसमें छात्रों का योगदान महत्वपूर्ण होगा।” या शब्दांत बहुमोल संदेश दिला. ‘भारत माता की जय’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीमती हेमलता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

गूँज रहा है दुनिया में

हिंदुस्थान का नारा।

चमक रहा है आसमान में

तिरंगा हमारा।

 

रेणुका स्वरूप प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती 

                         रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.अभिजीत देशमुख  यांना आमंत्रित केले होते. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर कथा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग मॅडम यांनी केले. त्यावेळी प्रशालेत घेण्यात आलेल्या कथाकथन, वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थिनींना pptच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दलची माहिती देण्यात आली . या प्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सविता हिले , पर्यवेक्षिका प्रज्ञा देशपांडे, सुनिता गायकवाड व जयसिंग जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रत्नमाला कांबळे, कावेरी गायकवाड, संजीवनी खैरमोडे व योगिता दरे यांनी केले.

 

 

 

 

इ.10 वी आणि इ.12 वी गुणगौरव समारंभ*

                       

                          रेणुका स्वरुप मेमो. गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत  परीक्षेत उत्तम यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ दि.१५ जुलै २०२३ रोजी संपन्न झाला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला.

                        कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी , पोलीस उपनिरीक्षक मा. पूजा राऊत उपस्थित होत्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश कसे मिळवले पाहिजे याविषयी त्यांच्या भाषणातून विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली.

                       या कार्यक्रमास प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा मा. आनंदी पाटील , महामात्रा मा. चित्रा नगरकर , प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. पूजा जोग व सर्व पदाधिकारी, पालक- शिक्षक संघाचे पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थिनी ,त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने  झाली.ईशस्तवनासाठी मार्गदर्शन सौ.जोशी,सौ. मेहेंदळे व सौ. लाड यांनी केले.

                       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा . मुख्याध्यापिका पूजा जोग  यांनी केले.स्वागत व परिचय सौ.जगताप, यादीवाचन सौ. खैरमोडे,  आभार सौ. कुलकर्णी आणि सूत्रसंचालन सौ. सामदेकर यांनी केले.

 

 

 

संकल्पपूर्ती

                       रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १० जुलै २०२३ रोजी प्रशालेच्या  माजी विद्यार्थिनी डॉ. ज्ञानेश्वरी लोखंडे – पाथरकर ( वर्ष २००३) यांनी रेणुका स्वरूप स्मृतिप्रीत्यर्थ ५०० विद्यार्थिनींना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

                        सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत हा आदर्श विद्यार्थिनींसमोर ठेवला .
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 मोहिम चांद्रयान ३

आपल्या प्रशालेत दि.14 जुलै 2023 रोजी भारताने आंध्रप्रदेश येथील श्रीहरिकोटा येथून शुक्रवारी दू.2.35 वाजता चांद्रयान 3 चे प्रक्षेपण केले ते लाईव्ह प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपल्या 1000 विद्यार्थिनींनी पाहिले.
यावेळी मा.मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी विद्यार्थिनींना या चांद्रयान 3 मोहिमेबद्दल माहिती दिली.

डिजिटल स्मार्ट बोर्ड प्रशिक्षण

      म.ए. सो.रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या पुण्यातील नामांकित प्रशालेला समर्थम ट्रस्ट फॉर दि डिसएबल संस्थेतर्फे  डिजिटल स्मार्ट बोर्ड मिळाला आहे. सर्व शिक्षकांचे अध्यापन दर्जेदार होण्यासाठी शनिवार दिनांक ८ जुलै २०२३ रोजी श्री. साहिल ललवानी व श्रीमती प्रियंका दरेबार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना डिजिटल बोर्ड हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.FIS Global या संस्थेने यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. हा स्मार्ट बोर्ड LCD खोलीमध्ये बसविण्यात आला असून याचा लाभ प्रशालेतील सकाळ दुपार विभागातील  व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थिनींना होणार आहे. प्रशालेस स्मार्ट बोर्ड प्राप्त करून देण्यास संस्थेच्या समन्वयक सौ. जयश्री भुजबळ यांनी सहकार्य केले.प्रशालेतर्फे वरील सर्वांचे मनःपूर्वक आभार.

                             

*गुरुपौर्णिमा -कार्यक्रम*

       रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक ३/०७/२३ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेत सकाळ विभागातील ज्योती कुल व दुपार विभागातील कलिका कुल यांनी वैविध्यपूर्ण रीतीने कार्यक्रमाचे आयोजन केले.

       प्रशालेतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते  व्यासपूजन करण्यात आले.  गुरुमहती व गुरुवंदना नृत्यातून सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी आदर्श गुरु-शिष्यांवर आधारित  सुंदर नाट्य, कविता व भाषण याद्वारे गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थिनींनी सांगितले.या निमित्ताने गुरू सन्मान म्हणून शिक्षकांना बुकमार्क व छोटी डायरी देण्यात आली.

इयत्ता ५ वी ते ७ वी पालखी सोहळा कार्यक्रम

        आषाढ महिना म्हटला की संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूर वारीची आस लागलेली असते. महाराष्ट्राचा हा संस्कार व ही परंपरा विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २८/०६/२०२३ रोजी  इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या पारंपारिक पोशाखामध्ये तसेच विठुरायाच्या जयघोषात शाळेच्या आवारातच पालखी काढली. भावे प्राथमिक सभागृहात विठ्ठल रखुमाईचे पूजन करण्यात आले. विठुरायाचा नामघोष करून विद्यार्थिनींनी विठुरायाचे पूजन केले.

 तसेच आषाढी एकादशी निमित्त प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या अभंग स्पर्धेमध्ये प्रत्येक इयत्तेतून जो वर्ग विजयी झाला त्या वर्गाने आपला अभंग यावेळी सादर केला.

 त्यामुळे अतिशय छान भक्तीपूर्ण वातावरण तयार झाले होते.

 

 म. ए. सो. रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये ‘ संकल्प दिन ‘  उत्साहाने साजरा

  ( बुधवार दिनांक १३- ०६- २०२३ )

                         अध्ययन- अध्यापनाचे कार्य करत असताना शिक्षकांना  अनेक नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागते. शैक्षणिक स्तरावर उद्भवणाऱ्या या समस्यांवर मात करण्यासाठी गेली अनेक वर्ष  रेणुका स्वरूप प्रशालेत  संकल्प दिनाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक स्तरावर जाणवणाऱ्या   समस्यांवर  शिक्षकांमार्फत वर्षभर अनेक प्रयत्न करून समस्येचे निराकरण केले जाते.                                                                     

                         या वर्षीही  नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला बुधवार दिनांक १३-०६-२०२३ रोजी   संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. संकल्पपूर्ती साठी आवश्यक ध्येये, उद्दिष्टे , कार्यवाहीचे नियोजन करावे व  विद्यार्थिनींमध्ये इष्ट ते बदल घडवून आणण्यासाठी विविध उपाय  योजावेत, असे मा.मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम यांनी  प्रास्ताविकात सांगितले.  त्यानंतर संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी संकल्प पूर्तीची  प्रतिज्ञा घेतली. काही शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  केलेल्या संकल्पाचे सादरीकरण केले व  पसायदानाने संकल्प दिन सभेची सांगता करण्यात आली.

                        या सभेसाठी शाळेतील सर्व पदाधिकारी व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

भव्य प्रदर्शन व विक्री

                                       

                        २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

                             २६ जानेवारी २०२३ रेणुका स्वरूप प्रशालेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास सकाळी ७:३० वाजता राष्ट्रध्वजारोहणाने सुरुवात झाली. प्रशालेच्या ग्रंथपाल श्रीमती अनघा करंदीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प्रशालेच्या महामात्रा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा नगरकर, मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, मा. पर्यवेक्षिका श्रीमती शर्मिला जोशी आणि श्रीमती प्रज्ञा देशपांडे, म.ए. सो.भावे प्राथमिक प्रशालेच्या मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती वृषाली ठकार , म.ए. सो. भावे पूर्व प्राथमिक प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती मेधा दाते या उपस्थित होत्या. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन प्रशालेच्या आजी व माजी विद्यार्थिनींच्या घोष पथकाने राष्ट्रगीताचे वादन केले. सर्व मान्यवरांनी भारतमाता प्रतिमेचे पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती वृषाली ठकार यांनी ध्वज प्रतिज्ञा दिली. रेणुका स्वरूप च्या गायन विभागाच्या विद्यार्थिनींकडून ध्वजगीताचे गायन झाले. सर्व मान्यवरांना प्रशालेच्या एन.सी.सी., घोष पथक, आर. एस. पी., स्काऊट गाईड आणि कुलप्रमुख पथकाने मानवंदना दिली. ज्या विद्यार्थिनींचा या दिवशी वाढदिवस आहे अशा विद्यार्थिनींचा तुळशीरोप देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध इयत्तांमधील विद्यार्थिनींनी तयार केलेली क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित हस्तलिखितांचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती स्वाती बुऱ्हाडे यांनी हस्तलिखितासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अनघा करंदीकर यांनी ‘दैनंदिन जीवनातील नियम पाळणे म्हणजेच देशभक्ती होय’ असा संदेश दिला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा नगरकर यांनी ‘आपल्या देशाची वाटचाल कशा पद्धतीने आधुनिकतेकडे होत आहे तसेच आपल्या संविधानाने आपल्याला जसे अधिकार दिले आहेत तशीच कर्तव्ये देखील दिली आहेत, यात आपल्या सर्वांची भूमिका कशी असली पाहिजे’ याची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी भावे प्राथमिक प्रशालेचे समूहगीत, देशभक्तीपर नृत्य, लेझीम तर रेणुका स्वरूप प्रशालेचे विविध साहित्याच्या आधारे कवायती आणि आणि घोष पथकाचे माजी विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक झाले. उत्तम प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण झाले . मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रीमती सुनिता सोनवणे आणि श्रीमती मानसी पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून ‘प्रजासत्ताक दिन’ या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

                                       प्लॅस्टिक संकलन आणि प्लॅस्टिक प्रदान अभियान


आज दिनांक 18 जानेवारी 2023 उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींनी जून महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत आपल्या घरातील, परिसरातील प्लॅस्टिक संकलित केले आणि ते ‘केशव सीता ट्रस्ट’ या प्लॅस्टिक रिसायकलिंग करणाऱ्या संस्थेला प्रदान केले. जून महिन्यापासून विविध प्रकारच्या प्लास्टिक बंदीच्या उपक्रमातून आपण उच्च माध्यमिक विभागामध्ये विद्यार्थिनींचे प्रबोधन करत आहोत. या अंतर्गत विद्यार्थिनींच्या घरामध्ये त्यांच्या परिसरामध्ये तसेच शाळेतील सकाळ विभाग व दुपार विभागातील विविध विद्यार्थिनींच्या वर्गांमध्ये जाऊन प्लॅस्टिक बंदी बाबत विद्यार्थिनींनी प्रबोधन केले, स्नेहसंमेलनामध्ये प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांना अनुसरून ‘प्लॅस्टिक एक भस्मासुर’ असे महानाट्य आपण सादर केलेले आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थिनींनी आपल्या पालकांचे याबाबत उद्बोधन केलेले आहे. आज आपल्या उच्च माध्यमिक विभागाने एकूण मिळून 491 किलो प्लॅस्टिक केशव सीता ट्रस्ट या संस्थेला प्रदान केलेले आहे.      

                 

 राष्ट्रीय गणित दिवस

 

                                 22 डिसेंबर “राष्ट्रीय गणित दिवस”  या निमित्ताने प्रशालेत खालील स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थिनींनी अतिशय आनंदाने सहभाग घेतला. या वरील उपक्रमासाठी सर्व गणित शिक्षकांनी विद्यार्थिनींकडून तयारी करून घेतली.

क्र.

स्पर्धेचे नाव

विद्यार्थिनी संख्या

 

 

5 अ , 6 अ , 7 अ

8  वी ते 10  वी

1.

गणितीय रांगोळी स्पर्धा

42

92

2.

भारतीय गणितज्ञ पोस्टर स्पर्धा

07

56

3.

गणितीय कविता सादरीकरण स्पर्धा

03

40

4.

गणितीय मॉडेल स्पर्धा

02

15

 

या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. 11 जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. गीतांजली फाटक उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका जोग मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व गणित गीताने झाली. प्रसिध्द गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची माहिती स्वराली देशमुख या विद्यार्थिनीने सांगितली. गणितीय कविता सादरीकरण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींनी कार्यक्रमात त्यांच्या कविता सादर केल्या.

प्रमुख पाहुण्या डॉ. फाटक यांनी सर्व उपक्रमाचे व स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन कौतुक केले. तसेच दैनंदिन जीवनात व सर्व विषयात गणित कसे महत्त्वाचे आहे, पुढील शिक्षणात गणित घेऊन आपण कसे पुढे जाऊ शकतो याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. गीतांजली फाटक यांनी विद्यार्थिनींना गणिततज्ञांची माहिती मिळावी यासाठी प्रशालेस एक पुस्तक भेट दिले.

 

महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा ज्योत रॅली

दिनांक 6 जानेवारी 2023 महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा ज्योत रॅलीचा उद्घाटन कार्यक्रमामध्ये आपल्या प्रशालेच्या घोषाचे वादन झाले. तसेच शगुन, चौक लक्ष्मी रोड आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन येथे देखील वादन झाले.  या वादनामध्ये 5 माजी विद्यार्थिनी आणि 24 नवीन विद्यार्थिनी अशा एकूण 29 विद्यार्थिनी सहभागी होत्या.या घोष पथकाला श्री.सागर वाळके सर यांनी मार्गदर्शन केले. माननीय मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग मॅडम या रॅलीमध्ये घोष पथकाबरोबर पूर्णवेळ उपस्थित होत्या. त्यामुळे सर्वांचे मनोधैर्य वाढले. शिस्तबद्ध आणि उत्तम वादनाने घोष पथकाने सर्वांची मने जिंकली.

शगुन चौक, लक्ष्मी रोड येथे वादन करताना घोष पथक
SSPMS शाळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उद्घाटन कार्यक्रमात सहभागी घोष पथक

 

रेणुका स्वरुप मेमो. गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे.

वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन २०२२-२३.

                             

                         दिनांक २३ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रशालेमध्ये मुख्य पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कला, क्रीडा आणि अभ्यासामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रशालेकडून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि समाजसेविका श्रीमती शुभांगी कोपरकर या लाभल्या होत्या. “आज माझ्या अंगी जी विविध कौशल्ये आणि गुण विकसित झाले त्याचे पूर्ण श्रेय मी आपल्या रेणुका स्वरुप शाळेला देते.” या शब्दात त्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  

                        कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मा. महामात्रा श्रीमती चित्रा नगरकर उपस्थित होत्या. मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, पर्यवेक्षिका श्रीमती शर्मिला जोशी आणि प्रज्ञा देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर वाळके यांनी केले तर श्रीमती माधुरी कल्याणी यांनी मान्यवरांचे आभार मानले.                                                                                                           सदर स्नेहसंमेलन सप्ताहात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात क्रीडा स्पर्धा, पालकांच्या डिश डेकोरेशन आणि संगीत खुर्ची स्पर्धा, मिस रेणुका स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.

 

रेणुका स्वरूप प्रशालेत जागतिक योग दिन २०२२ उत्साहात साजरा.

            मंगळवार दिनांक २१ जून २०२२ रोजी रेणुका स्वरूप प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात १४०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी योग प्रशिक्षक श्रीमती भागवत ताई व श्री बंदावणे सर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात २५ पेक्षा अधिक योगासने आणि प्राणायाम करण्यात आले. नियमित योगाभ्यास आणि प्राणायाम करण्याचा सर्व उपस्थितांनी संकल्प केला. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिन

              दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी विज्ञानदिनानिमित्त प्रशालेत विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. या मध्ये भारतीय शास्त्रज्ञ इ. ५ वी साठी प्रयोगशाळा दाखविणे व साहित्याची ओळख करून देणे, इ. ६ वी साठी भारतीय शास्त्रज्ञांविषयी  वक्तृत्व स्पर्धा, इ. ७ वी साठी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. एस. पी. कॉलेज आयोजित विज्ञान वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये इ. ६ वी ब मधील मोरे सानवी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.फर्ग्युसन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सूर्यमाला,अवकाश प्रक्षेपण व आयुका यावर आधारित माहितीचे सादरीकरण PPT द्वारे ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी केले. इ. ५ वी ते ७ वी च्या सर्व विद्यार्थिनींसाठी ग्रंथालयात वैज्ञानिक पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अशाप्रकारे विज्ञान सप्ताह प्रशालेत उत्साहात संपन्न झाला.

म. ए. सो. शिक्षणविवेक आयोजित लेखन कौशल्य विकास कार्यशाळा

          दिनांक २५/३/२०२२ , गुरुवार रोजी दु. १२.३० ते ३.३० या वेळात  भावे प्राथमिक हॉल येथे म. ए. सो. शिक्षणविवेक आयोजित लेखन कौशल्य विकास कार्यशाळा  संपन्न झाली .कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि त्यांचे सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. चित्रकला, अभिनय, हस्तकला, लेखन या प्रमाणे गट केले होते. चित्र गोष्ट, दिलेल्या शब्दांच्या मदतीने गोष्ट तयार करणे. वस्तूवर आधारित आठवण सांगणे. या प्रकारचे खेळ घेतले गेले. अभिव्यक्तिला चालना मिळाली. मुलींनी वस्तू तयार केल्या. नाटक सादर केले, कथा ऐकविल्या. मा.मुख्याध्यापिका जोगबाई, मा. उपमुख्याध्यापिका हिलेबाई, मा. पर्यवेक्षिका जोशीबाई यांचे मार्गदर्शन लाभले.

 

विज्ञान कार्यशाळा

 

          दि. १५ फेब्रुवारी ते ८ मार्चच्या दरम्यान  कास्प  संस्था, मुक्तांगण शोधिका, रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रेणुका स्वरूप प्रशालेत ‘ विज्ञान कार्यशाळा ’ आयोजित करण्यात आली. विद्यार्थिनींना विज्ञान विषयाची आवड निर्माण  व्हावी, विज्ञान, गणितातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, हा कार्यशाळेचा उद्देश होता.

                        Physics, Chemistry, Biology, Maths, Earth Science, Innovative Technology I, II या विविध विषयांवर १४ कृतियुक्त व्याख्याने घेण्यात आली. यामधे इ. ८ वी व ९ वी तील ५० विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थिनींना सायन्स कीटचे वाटप खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्मिता बर्वे – कास्प प्रोजेक्ट मॅनेजर, नेहा निरगुडकर – मुक्तांगण exploratory  डेप्युटी डायरेक्टर. कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षिका गायकवाड सुनिता व कुलकर्णी श्रध्दा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या  पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी

 

                 गुरूवार दि. २४/०२/२०२२  रोजी  रेणुका  स्वरुप  प्रशालेत  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती  देण्यासाठी, विद्यार्थिनींमध्ये  देशप्रेम जागृत करण्यासाठी

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. कुल सरिता ,९ वी केवडा व ८ वी चाफा या वर्गांनी या मध्ये सहभाग घेतला.

         या कार्यक्रमासाठी इतिहास विषयाचे समन्वयक श्री. श्रीकांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वा. सावरकरांच्या जीवनातील प्रसंग ओघवत्या शैलीत कथन केले.  पाहुण्यांच्या हस्ते  कै. नागेश आठवले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे  विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता गायकवाड यांनी केले. प्रशालेच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

८ मार्च महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी कथाकथन कार्यक्रम

         दिनांक ८ मार्च २०२२  मंगळवार रोजी महिला दिनानिमित्त दुपार विभागातील इयत्ता ५ अ,६अ,७अ तसेच इयत्ता ८ वी व इयत्ता ९ वी मधील सर्व विद्यार्थिनींसाठी  कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सौ.मेघा दाते कार्यक्रमाच्या पाहुण्या होत्या.त्या उंड्री येथील शाळेत जर्मन भाषा अध्यापन करतात. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.या संवादाद्वारे त्यांनी महिला दिनाची माहिती सर्वांना सांगितली.तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या योगदानाची माहिती सांगितली.शेवटी दोन अपरिचित अशा क्रांतिकारक महिलांच्या कथा सांगितल्या.

 

जागतिक महिला दिन कार्यक्रम

मंगळवार  दिनांक ८/३/२०२२ रोजी भावे प्राथमिक हॉलमध्ये सकाळी १०:३० वा. आपल्या रेणुका स्वरूप प्रशालेचा जागतिक महिला दिन  कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवनाने झाली. शिरीषा जोशी यांनी सरस्वती स्तवन केले. मा.मुख्याध्यापिका जोग मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला दिनाची माहिती व महत्त्व सांगितले.या कार्यक्रमासाठी विविध आठ शाळांच्या मुख्याध्यापिकांना निमंत्रित करण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. सौ. सोनावणे सुनिता यांनी सर्व मुख्याध्यापिकांचा परिचय करून दिला. या सर्व मुख्याध्यापिकांना स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख  मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी प्रशालेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध व आत्मीयता व्यक्त केली. प्रशालेत चाललेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. काळे ज्योती यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी कार्यक्रम

           दिनांक 26 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी ज्योत्स्ना कुलातील 7वी जाई व 6वी कमळ या वर्गाने स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी हा कार्यक्रम सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणे व भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल मुलींना माहिती होणे हा या कार्यक्रमाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केले .प्रथम मा. मुख्याध्यापिकांच्या व प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .6वी कमळ मधील कु. आर्या साळवी हिने सावरकरांची छोटीशी गोष्ट सांगितली, तर 7वी जाई मधील कु. सोनल पवार हिने सावरकरांविषयी माहिती सांगितली .या कार्यक्रमास शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले .

पुस्तक प्रदर्शन 

       मराठी आणि विज्ञान दिनानिमित्त  दिनांक 23 फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशालेत मराठी व विज्ञानाच्या निवडक पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालय इ. 5 ते 7 वी साठी भरविण्यात आले होते .

विद्यार्थिनी प्रदर्शन पाहताना

 

विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी 

         राष्ट्रीय बाल स्वास्थ्य महाराष्ट्र शासन (RBSK) व WHO यांच्या संयुक्त व विद्यमाने  बालिकांची प्राथमिक तपासणी किरकोळ औषधोपचार सुरू केले आहेत. पुण्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. गीतांजली शिंदे व त्यांच्या सर्व टीमने मुलींची तपासणी केली .करोना चे सर्व नियम पाळून मुलींनी छान प्रतिसाद दिला . प्रशालेच्या मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले सविता व पर्यवेक्षिका सौ. जोशी शर्मिला यांनी नियोजन केले होते.

डॉक्टर वैद्यकीय तपासणी करताना

सॉफ्ट स्कील्स्  कार्यशाळा

                   दिनांक 4 फेब्रुवारी व 9 फेब्रुवारी 2022  या दिवशी आपल्या प्रशालेतील माजी विद्यार्थिनी श्रुती देशपांडे यांनी इयत्ता 10 वी अबोली, गुलाब आणि 9 वी केवडा, जाई या वर्गातील विद्यार्थिनींना Soft Skills Development या विषयावर मार्गदर्शन केले. या मध्ये इग्रंजी बोलण्यावर प्रभुत्त्व  मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे तसेच  नोकरी मिळवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे Job Skills म्हणजे काय यावर सुसंवाद साधला. विद्यार्थिनींना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Soft Skill Development कार्यशाळा

 प्रशालेतील विद्यार्थिनीस  AIR WING तर्फे फ्लाइंगची संधी

आज आपल्या प्रशालेतील कु. दिव्यांका दानावले 9 वी मधील मुलगी हिला AIR WING तर्फे फ्लाइंगला नेण्यात आले. एक वेगळाच अनुभव तिला मिळाला. मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संस्थेने ही छान संधी मुलींना दिली.

 

दिव्या दानावले

मकर संक्रांत

                 दरवर्षीप्रमाणे या वर्षी मकरसंक्रात हा कार्यक्रम शुक्रवार दिनाक १४ जानेवारी २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे मकर संक्रातीच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा सहभाग प्रत्यक्ष घेता आला नाही. कुलातील सहभागी वर्ग ७ वी गुलाब व ६ वी केवडा, यांचे तर्फे मकर संक्रात या सणाचे महत्व आणि भौगोलिक व शास्त्रीय माहिती ऑडिओद्वारे सांगण्यात आली. ५ वी ते ७ वी च्या सर्व वर्गांवर पाठविण्यात आली. या सर्व कार्यक्रमासाठी शालेय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले.

जीवन मूल्ये आणि गांधीजी

         दिनांक 29 जानेवारी 2022, शनिवार या दिवशी सकाळी 9.15 वा. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रशालेच्या मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले यांनी प्रतिमेचे पूजन केले. मा.पर्यवेक्षिका शर्मिला जोशी यांनी गांधीजींची तत्वे आणि विचार यांच्याबद्दल सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्रशालेचे सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन हे मूल्य रुजविण्यासाठी इयत्ता नुसार गट पाडण्यात आले. प्रत्येक गटाला  विषयानुसार प्रत्यक्ष अनुभव घेऊन आभासी पद्धतीने video clips तयार करण्यास सांगण्यात आले . यासाठी 5वी व 6वी स्वावलंबन (घरातील स्वतःची कामे करणे) ,7 वी व 8वी स्वच्छता व स्वावलंबन (घर/ शेजारी यांना कोणत्याही कामात केलेली मदत) आणि 9वी ते 12वी हस्त उद्योग (स्वतःची आवड/छंद यांचा विचार करून एक हस्त उद्योगाची माहिती देणे ) असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.

 

युवा चेतना  दिन

               प्रशालेत बुधवार दिनांक 12.1.2022  या दिवशी तारका कुलाने इयत्ता 5 वी  केवडा आणि 7 वी  चाफा वर्गशिक्षिका-सौ. धार्मिक, सौ. आदमाने.या वर्गांनी स्वामी विवेकानंद जयंती चा कार्यक्रम सादर केला. माननीय पदाधिकारी यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि पाचवी केवडातील विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंद यांची माहिती ऑनलाईन सांगितली.

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम

             सोमवार दि.3 जानेवारी  2022 या दिवशी प्रशालेत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती इयत्ता  7 वी केवडा आणि इयत्ता 5 वी गुलाब या वर्गाच्या ‘कमळ’ कुलातर्फे साजरी करण्यात आली.

          प्रथम माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती.हिले मॅडम यांच्या हस्ते ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवी या वर्गातील कुमारी यशश्री पाटील या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य तसेच मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट या सगळ्यांची माहिती अतिशय उत्तम आणि सोप्या भाषेत सांगितली. यशश्री पाटील या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच पोशाख परिधान केला होता. तसेच पाचवी गुलाब मधील कुमारी श्राव्या पेंडसे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर अशी ओवी तालासुरात सादर केली. यामध्ये सर्व मुलींनी तिला गाण्याची साथ दिली. सावित्रीबाई फुले यांची ओवी सादर करतानाचा मुलीं बरोबरचा व्हिडिओ तयार करून सर्व वर्गाच्या ग्रुपवर पाठविला. अशा प्रकारे या  कार्यक्रमास प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

सावित्रीबाई फुले जयंती

..सो.रेणुका स्वरूप प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

दिनांक २०डिसेंबर २०२१रोजी ..सो. रेणुका स्वरूप मेमो.गर्ल्स हायस्कूल येथे सन.२०२१२२ मधील इयत्ता ५वी ते १२वी च्या विद्यार्थिनींचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

            या कार्यक्रमास मा.मुख्याध्यापिका श्रीमती. पूजा जोग व प्रशालेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कोविडचे सर्व नियमांचे पालन करीत विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रम सादर केले. वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

स्नेहसंमेलन – लोकनृत्य
स्नेहसंमेलन- उच्च माध्य. विभाग मायमिंग

स्नेहसंमेलन – समूहगीत
स्नेहसंमेलन – उद्घाटन समारंभ
स्नेहसंमेलन – दीप प्रज्वलन
स्नेहसंमेलन – विशेष विद्यार्थिनी नृत्य सादरीकरण

मंडळ प्रमुख निवडणूक २०२१-२२

मंडळप्रमुख निवडणूक २०२१-२२

 

    गुरुवार २३/१२/२०२१रोजी रेणुका स्वरूप प्रशालेतदुपार विभागात आवाजी मतदान पद्धतीने निवडणुका झाल्या.या उपक्रमाद्वारे  मुली स्वतः निवडणूकीचा अनुभव घेतात, त्यांना नेतृत्वाची चांगली संधी मिळते.

५वी ते १०वीच्या४० कुलप्रमुख मुलींनी मतदानाचा हक्क बजावला.त्यामधून

*विजया कारंडे ९ अ २८ मते

*गौरी जाधव ९ ब २२ मते

*तनिष्का आयवळे ९ अ १९ मते मिळवून मंडळ प्रमुखपदी निवडून आल्या

त्यांचे शाळेकडून अभिनंदन व शुभेच्छा

 

 

  • भारतीय संविधान दिन ●

प्रशालेत २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाच्या प्रतीचे प्रशालेच्या पदाधिकारी यांनी पूजन केले . संविधान निर्मितीचा इतिहास व  संविधानाचे भारतीयांसाठी असलेले महत्त्व यांची माहिती सौ .पोटेगावकर यांनी सांगितली व त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रतिज्ञापूर्वक करून घेण्यात आले . संविधान दिनाच्या निमित्ताने शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे .

संविधान दिन

देशहितोत्सुक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा १६१ वा वर्धापन दिन

शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी म. ए. सो. रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा १६१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेच्या संगीत शिक्षिकांनी यावेळी म.ए.सो. गीत सादर केले.मा.मुख्याध्यापिका श्रीम.जोग यांनी संस्था स्थापनेपासून ते  आजतागायत संस्थेचा झालेला विकास याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा  इतिहास श्रीम.मेहेंदळे यांनी सांगितला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आषाढी एकादशी

उदय कुलातर्फे इ. ५वी  कमळ, ७वी अबोली व कमळ  कुलातील ८वी जाई व १०वी अबोली ह्या वर्गांनी मंगळवार दि. २०/ ०७/२०२१ रोजी आषाढी एकादशीचा कार्यक्रम सादर केला.
विद्यार्थिनींना वारकरी  संप्रदायाची व आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता. आषाढी एकादशीची माहिती सांगितली व भजन सादर केले. या कार्यक्रमात  विद्यार्थिनींनी  उत्साहाने  सहभाग घेतला. कार्यक्रमात  विद्यार्थिनींनी  उत्साहाने  सहभाग घेतला .


  क्रांतिदिन

सोमवार दि.9 ऑगस्ट 2021 रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून आणि प्रशालेतील कुलपरंपरेला अनुसरून 6वी गुलाब आणि 7वी मोगरा या वर्गाच्या सुधांशू कुलातर्फे क्रांतिदिन साजरा करण्यात आला.
कु. सानवी मोरे या विद्यार्थिनीने क्रांतिदिनाची माहिती सांगितली. क्रांतिदिनाची महती जाणून सर्व शिक्षकांनी पोवाडा सादर केला. देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण आणि राष्ट्रीय भावना जागृत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

 


राष्ट्रीय क्रीडा दिन        

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट राष्टीय क्रीडा दिन म्हणून प्रशालेत ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमती रश्मी देशमुख यांनी विद्यार्थिनींना खेळाविषयी मार्गदर्शन केले. इयत्ता ९ वी मधील विद्यार्थिनींनी क्रीडागीतात सहभाग घेतला, तसेच इयत्ता ६ वी मधील सानवी मोरे या विद्यार्थिनीने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरील प्रसंगाची माहिती सादर केली.


गणेश चतुर्थी

         दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी  रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये रेणुका परिवारातर्फे गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी गणेशस्तवन, अर्थवशीर्ष, गणपतीगीत सादर केले. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहाने व आनंदाने पार पडला.


                                             

गुरूपौर्णिमा

                    म.ए.सो.कलावर्धिनी व म.ए.सो.रेणुका स्वरूप मेमो.गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फ़े  शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१ रोजी प्रशालेत ऑनलाईन पद्धतीने गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थिनीनी गुरूचे महत्त्व,गुरुची महती सांगणारे गीत, गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि गुरु शिष्याची गोष्ट असे विविध कार्यक्रम सादर केले. कु.श्वेता शिंदे,कु. अनन्या ओगले, कु.स्वराली देशमुख, कु. श्रेया गायकवाड इ. विद्यार्थिनीनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.


गोकुळाष्टमी

                     दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ मंगळवार रोजी ज्योती कुलातर्फे ७ वी कमळ व ६ वी चाफा या वर्गातर्फे गोकुळाष्टमी चा कार्यक्रम साजरा करण्यात आला .इयत्ता ६ वी चाफा या वर्गातील कु .वृंदा पेशवे हिने विद्यार्थिनींना गोकुळाष्टमी चे महत्त्व सांगितले .इयत्ता ७ वी कमळ या वर्गातील कु . देवीका गोरे हिने सुंदर नृत्य सादर केले . कुलाने तयार केलेला व्हिडिओ सर्व वर्गाच्या व्हाट्सएप ग्रुप वर पाठविण्यात आला .अशाप्रकारे पदाधिकारी व कुलातील विद्यार्थिनी या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.


  ग्रंथालय पुस्तक प्रदर्शन  

              दि. ११/१०/२०२१ ते १४/१०/२०२१ या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर म्हणून ग्रंथालयात स्त्रियांचे चरित्र या विषयावर प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनाचा सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी लाभ घेतला.या प्रदर्शनातील पुस्तकांची अनेक शिक्षकांनी मागणी नोंदवून ती पुस्तके वाचनासाठी घेऊन त्याचा लाभ घेतला.


छत्रपती शाहूमहाराज जयंती(२०२०-२१)

कुल-उदय—-(वर्ग-७वी अबोली,५वीकमळ)
       दिनांक २६जून रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये छत्रपती शाहूमहाराज जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.शाहूमहाराजांचे व्यक्तिमत्व व त्यांनी बहुजनांसाठी केलेले कार्य समजेल, अशा स्वरूपाची चित्रफीत तयार करून विद्यार्थिनींना पाठवण्यात आली.विद्यार्थिनींनी यातून प्रेरणा घेऊन शाहूमहाराजांचे विचार आचरणात आणावेत, तसेच त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी वाचन करावे असे आवाहन करण्यात आले.


 लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती २०२१२२ 

 सोमवार दि. २ ऑगस्ट २०२१ रोजी प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती तारका कुलातील वर्ग ७ वी चाफा, ५वी केवडा यांच्या तर्फे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थिनी ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला व विजेत्या विद्यार्थिनींचे वक्तृत्व सादरीकरण झाले. राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय भावना जागृत करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.


दहीहंडी

         दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपार विभागात भारती कुलातर्फे इ. ९ वी व इ. १० वी या वर्गातील विद्यार्थिनींनी दहीहंडी कार्यक्रम ऑनलाईन सादर केला. सहभागी विद्यार्थिनींनी श्री कृष्णाची माहिती, दहीहंडीचे महत्व, गोपाळकाला म्हणजे काय व या सणांचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचा शेवट आज गोकुळात रंग खेळतो हरी या गीताने झाला.


दीप अमावस्या

                        रविवार दिनांक 8/8/21रोजी दीप अमावस्या साजरी करण्यात आली.विद्यार्थिनींना घरोघरी दिवे स्वच्छ धुऊन पूजन करण्यास प्रवृत्त केले. श्रीमती सुरेखा कांबळे यांनी दीप अमावस्या ची कथा सांगितली.  अशाप्रकारे दरवर्षी प्रमाणे दीप अमावस्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली.


महाकवी कालिदास दिन

           दि. ११जुलै२०२१ रोजी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. इ. १०वी अबोली मधील  श्वेता  शिंदे , श्रेया गायकवाड, सर्वेशा सिद्धेश्वर या विद्यार्थिनींनी महाकवी कालिदासाची गोष्ट, त्यांच्या साहित्याची ओळख,संस्कृत भाषेचे महत्व आणि कालिदासांची चातुर्यकथा यांविषयी व्हिडीओज द्वारे माहिती दिली.


महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती

                   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२वी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची ११८वी जयंती प्रशालेमध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरी करण्यात आली. देशाच्या या दोन महान नेत्यांची माहिती व्हावी व त्त्यांचे चरित्र विद्यार्थिनींना समजावे यासाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता ५वी च्या विद्यार्थिनीने  महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यावर आधारित कविता सादर केली व इयत्ता ६वी च्या विद्यार्थिनीने महात्मा गांधीजीची गोष्ट सांगितली.


रेणुका स्वरूप प्रशालेत ‘योगसप्ताह’ उत्साहात साजरा .

              पुणे.दि.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने २२जून ते २७जून २०२१ या कालावधीत ऑनलाइन ‘योग सप्ताह’  घेण्यात आला .
    या कार्यक्रमात प्रशालेतील ९०० विद्यार्थिनी व पालक सहभागी झाले होते.
योगसप्ताहातील विशेष कार्यक्रम म्हणून डॉ.जयश्री खांडगे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानात कोरानाची तिसरी लाट आणि त्या संदर्भात  पडलेले प्रश्न, या लाटेचा परिणाम कमी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आहार, विहार, रोगप्रतिकारवर्धक औषधे व लसीकरण या मुद्द्यांच्या आधारे मुलींना व पालकांना डॉ. जयश्री खांडगे यांनी मार्गदर्शन केले. पालकांनी विचारलेल्या सर्व शंकांचेही डॉ. खांडगे यांनी उत्तम प्रकारे निरसन केले.


रक्षाबंधन

                    विद्यार्थिनीना सणांचे महत्त्व समजावे, भारतीय संस्कृतीतील सणांचे विचार सध्याच्या काळात विद्यार्थिनी वेगळ्या पद्धतीने आचरणात आणावे या हेतूने प्रशालेमध्ये वृक्षांना रक्षाबंधन करण्यात आले.
         कोरोना या वैश्विक महाआपत्तीच्या काळात ऑक्सिजनची कमतरता प्रकर्षाने जाणवली. हा प्राणवायू पुरविणाऱ्या वृक्षांना कृतज्ञता म्हणून राख्या बांधण्यात आल्या .या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृती वृक्षसंवर्धन या बहुमोल विचाराचा प्रचार झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थिनीना राखी पौर्णिमेची माहिती online सांगितली.


रेणुका स्वरूप स्मृतिदिन

        दिनांक १० जुलै २०२१ रोजी रेणुका स्वरूप हिचा स्मृतिदिन  रेणुका स्वरूप प्रशालेच्या प्रांगणात साजरा झाला.मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी रेणुका स्वरूपच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली. सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत रेणुका स्वरूप हिचा जीवन परिचय करून देण्यात आला. श्रीमती बनकर, श्रीमती शर्मिला जोशी, श्रीमती सोनावणे यांनी रेणुका स्वरूप हिचा जीवन परिचय करून दिला.


शिक्षक दिन

        5 सप्टेंबर 2021 रोजी कुल – ज्योस्त्ना, वर्गइयत्ता वी कमळ, 7वी जाई यांनी शिक्षक दिन साजरा केला. यामध्ये शिक्षक दिनाचे महत्व सांगणारा व्हिडीओ ज्योस्त्ना कुलामार्फत   व्हाट्सअपद्वारे सर्व वर्गांवर प्रसारित करण्यात आला. या व्हिडीओ मध्ये ६वी कमळ मधील कु. आर्या सचिन साळवी हिने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.तसेच प्रशालेतील सर्व  पदाधिकार्‍यांच्या हस्ते  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


शिक्षक भोंडला

        महालक्ष्मी मंदिर , सारसबाग पुणे यांच्यावतीने सर्व शिक्षकांसाठी भोंडला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . करोनाच्या जागतिक संकटात सर्व शिक्षक शिक्षणाचे अप्रतिम कार्य करीत मुलांना ज्ञान देण्याचे काम करीत आहेत . अशा स्थितीमध्ये शिक्षकांना विरंगुळा मिळण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने ही स्पर्धा दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली . या स्पर्धेत प्रशालेने सहभाग घेतला होता . सर्व शिक्षक या स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी झाले होते . या स्पर्धेत प्रशालेला  प्रथम क्रमांक मिळाला .


श्रावणी शुक्रवार

दर वर्षीच्या परंपरे प्रमाणे शाळेमध्ये श्रावणी शुक्रवार साजरा केला जातो. यंदाही संस्कृती संवर्धन म्हणून प्रशालेतील सर्व शिक्षकांनी ३ सप्टेंबर २०२१  रोजी श्रावणी शुक्रवार  साजरा केला. माननीय मुख्याध्यापिका पूजा जोग, सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी सरस्वतीचे पूजन व आरती केली. आणि सर्वांना फुटाणे व गजरे देण्यात आले. अशा प्रकारे आनंदात व उत्साहात श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात आला.


स्वातंत्र्यदिन कार्यक्रम 

 दिनांक 15 ऑगस्ट 2021 रविवार रोजी  भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रेणुका परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत  साजरा झाला . या प्रसंगी अ.भा.वि.प. च्या सु.श्री. ममता यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
           सु.श्री.ममताजी यादव व भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती. ताठे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन केले, राष्ट्रगीतानंतर मंचस्थ मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रेणुका स्वरूप प्रशालेच्या शिक्षकांनी ध्वजगीताचे गायन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सु.श्री.ममताजी यादव यांच्या हस्ते भावे प्राथमिक शाळेच्या ‘प्रतिबिंब’ या नियतकालिकाचे प्रकाशन  करण्यात आले.
           प्रमुख पाहुण्या ममताजी यांनी भारताची उज्ज्वल संस्कृती, परंपरा, भारताचे जगातील उच्चतम स्थान, भारतातील  थोर व्यक्तिमत्त्वे व त्यांचे भारताच्या यश व प्रगतीमधील  योगदान व अनेक  थोर विभूतींची कामगिरी यांबद्दल माहिती दिली. रेणुका स्वरूप प्रशालेच्या चित्रकला शिक्षिका श्रीमती यशोदिनी कुलकर्णी यांनी  रांगोळीतून टोकियो ऑलिम्पिक मधील भारताचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा  याचे  सुंदर व्यक्तिचित्र रेखाटले होते.