इतिहास

  • हाऊस सिस्टीम म्हणजे कुलपद्धती.
  • १९४२ साली ही कुलपद्धती  प्रशालेत तत्कालीन मुख्याध्यापक मा.मालशे गुरुजी यांनी स्थापन केली.
  • सध्या शाळेत ज्योती, भारती, कमल, ज्योत्स्ना, कलिका, तारका, उदय, हंस, सरिता, सुधान्शु, गायत्री, जिजाऊ, राणी लक्ष्मी अशी कुले अस्तित्वात आहेत.
  • प्रत्येक कुलाला एक ध्येयवाक्य असते.
  • शाळेतील उपक्रम प्रत्येक कुलाला विभागून दिले जातात.
  • उपक्रम  चांगला होण्यासाठी वेगवेगळ्या वर्गातील विद्यर्थिनी एकत्रित येतात.
  • मंडळाधिपती,मंडळप्रमुख, कुलप्रमुख अशी रचना   कुलपद्धतीची असते.
  • मंडळाधिपतींची निवडणूक शिक्षक वर्गाकडून होते.
  • मंडळप्रमुखांची निवडणूक लोकशाही निवडणूक पद्धतीने विद्यर्थिनी मतदान करतात.
  • कुलप्रमुख निवडणूक शिक्षक वर्गात उमेदवारांची नावे जाहीर करून मतदान घेऊन सर्वाधिक मते मिळविणारी विद्यर्थिनी कुलप्रमुख होते.
  • शाळेतील  वर्षभराचे  उपक्रम कुलाद्वारे राबविले जातात.शाळेतील शिस्त, सुव्यवस्था व स्वच्छता राखण्यासाठी कुलपद्धतीमुळे सुलभता आली आहे.
  • कुलपद्धतीमुळे विद्यर्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.