Skip to content
कुलाचे गाणे
चला गाऊया आपण सारे कुलाकुलांचे गाणे
जतन करू या परंपराही आनंदे अभिमाने||धृ ||
पूर्व सुरीनीलावियालेहे रोप वाढते जोमाने
कार्याला आरंभ करू या शपथेच्या या ग्रहणाने
दीक्षा विधीचा आज सोहळा सुसंपन्न हर्षाने
रेणुका प्रशलेच्या बाला गाती कुलाचे गाणे ||१||
सरीतेमाजी कमल विकसते सुधांशुच्या किरणाने
भारती कलिका ज्योती तेवती ज्योत्स्नेच्या स्नेहाने
न्याय असे भय तेथ नसे हंस म्हणे अधिकाराने
ध्येय तारा समोर ठेवा वागा पूर्ण विवेकाने||२||
तपातपांची परंपराही जिजाऊ लक्ष्मी कुलाची
शांती ,पुष्टी तुष्टी लाभे त्याग पूर्ण आचरणाची
तम पटलाला दूर सारुनी अंबर उजळे तेजाने
रेणुका नीनादे जय नादे सुयशाच्या जयघोषाने ||३||
काव्य रचना – स्वाती थत्ते