म.ए.सो.रेणुका स्वरूप प्रशालेस भव्य असे खेळाचे मैदान आहे. या मैदानाचा उपयोग विविध खेळांचा सराव, सामुदायिक कवायत, शालेय प्रार्थना(परिपाठ), घोषपथक सराव तसेच N.C.C., R.S.P., स्काऊट-गाईड अशा विविध उपक्रमांसाठी केला जातो.
शाळेला ५० मी.लांब व ३० मी.रुंद असे क्रीडांगण आहे. याची नियमितपणे देखभाल केली जाते.दररोज सांयकाळी पाणी मारले जाते. तसेच मैदानाची शोभा वाढावी म्हणन मैदानाच्या सभोवताली विविध प्रकारची झाडे लावली आहेत, त्याची निगा राखली जाते. पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्याकडून मिळालेल्या अनुदानातून व म.ए.सो. च्या सहकार्याने क्रीडांगण नुतनीकरण करण्यात आले.