ग्रंथालय

प्रास्ताविक
आपल्या प्रशालेचे ग्रंथालय सुसज्ज व अद्ययावत आहे. आपल्या ग्रंथालयात एकूण २६,४०० इतकी ग्रंथसंख्या आहे. ग्रंथालयात विषयानुसार ग्रंथाची रचना केली आहे. उदा. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र इ. ग्रंथाची भरपूर साठा आहे. तचेस ग्रंथालयात अनेक प्रकारची मासिके, नियतकालिके , वर्तमानपत्र येतात उदा. छात्र प्रबोधन, शिक्षण संक्रमण, किशोर, जीवन-शिक्षण इत्यादी.  विद्यार्थिनींना शालेय व आंतरशालेय विविध निबंध स्पर्धा, तसेच वकृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा, प्रकल्पासाठी लागणारी उपयुक्त माहिती पुरविली जाते याचा लाभ सकाळ / दुपार विभागातील विद्यार्थिनी व शिक्षक घेतात.

 

माजी विद्यार्थिनींच्या (१९७० ची बॅॅच) सहकार्याने यावर्षी ग्रंथालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे ग्रंथालयात
विद्यार्थिनींना बसून वाचता येईल एवढी जागा उपलब्ध झाली आहे. एकावेळेस ५० ते ६० विद्यार्थिनी ग्रंथालयात बसून वाचन करू शकतात.

 

इ.५ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींंकरीता ग्रंथालयातर्फे काही योजना राबविल्या जातात. जसे पुस्तक पेटी योजना, गृहवाचन योजना, वाढदिवसाला विद्यार्थिनी ग्रंथालयास पुस्तके भेट देतात तसेच शाळेवरील प्रेमाखातर माजी विद्यार्थिनी ग्रंथालयास पुस्तके भेट देतात. यात सर्व विषयांची, भाषांची निरनिराळी पुस्तके आहेत.

 

दरवर्षी ग्रंथालयात नवनवीन पुस्तकांची भर पडत आहे. यात सर्व विषयांची पुस्तके आहेत. या पुस्तकांचा लाभ सर्व शिक्षक व विद्यार्थिनींना व्हावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जात आहे.
श्रीमती. अनघा करंदीकर (ग्रंथपाल)

 

ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके / संदर्भ ग्रंथ / मासिके

ग्रंथालयात उपलब्ध ग्रंथ संख्या
नियत कालिके:
छात्र प्रबोधन, शिक्षण संक्रमण, जीवन शिक्षण, एकता, विवेक, सृष्टीज्ञान
मासिके:
 माहेर, स्त्री, मिळून साऱ्याजणी, तनिष्का, चंपक, किशोर, छात्रप्रबोधन
वृतपत्र:
सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, केसरी, सकाळ टाइम्स
शब्दकोश व विश्वकोश:
मराठी शब्दकोश (१) आदर्श मराठी शब्दकोश (२), मराठी शब्द रत्नाकर (१), हिंदी शब्दकोश (२), इंग्रजी शब्दकोश(२), विश्वकोश –मराठी विश्वकोश (१ ते १८ खंड )
इतर संदर्भ पुस्तके:
भारतीय संस्कृतीकोश – १ ते ११
मुलांचा संस्कृतीकोश – १ ते ३
परिमल शब्दकोश
मराठी सारस्वत – २ खंड
सुगम विज्ञानकोश – १ खंड
जागतिक विज्ञानकोश – १ खंड
गणितभाषा ज्ञानकोश – १ खंड
मराठी लेखनकोश, महाराष्ट्र दिन विशेष
शालेय अटलास – १०
सुलभ विश्वकोश – ३ खंड
Oxford Children Encyclopedia – १ ते ८ खंड
Junior World Encyclopedia – १ ते ४ खंड
Children Knowledge Bank
Limca Book of Record
ग्रंथालयातील शब्दकोश व विश्वकोश वगळता पुस्तकांची संख्या – २४,४००
गृहवाचनासाठी पुस्तके नेणार्‍या विद्यार्थिनीची संख्या
इयत्ता
वार
संख्या
५ वी
शुक्रवार
पुस्तक पेटी
६ वी
सोमवार.मंगळवार
पुस्तक पेटी
७ वी
बुधवार
पुस्तक पेटी
८ वी
सोमवार
१६५
९ वी
मंगळवार
२००
१० वी
बुधवार
१४५
११ वी
गुरुवार
५०
१२ वी
शुक्रवार
२५