संगणक प्रयोगशाळा

संगणक विभाग

आपल्या शाळेतील संगणक विभागात माहिती तंत्रज्ञान हा विषय सकाळ विभागात ५ वी ते ७ वी ला तसेच दुपार विभागात ८ वी ते १० वी ला अभ्यासक्रमानुसार शिकवला जातो.
सकाळ विभागात ५ वी ते ७ वी च्या एकूण ६९० तर दुपार विभागात ८ वी ते १० वी च्या १२०५ मुली संगणकाचे प्रशिक्षण घेतात.
प्रशालेच्या सुसज्ज अशा संगणक कक्षात एकूण २६ संगणक असून त्यातील १ Server व १० N computing आहेत व १५ संगणक LAN मध्ये आहेत. तसेच शासनाने दिलेल्या संगणक कक्षात १२ संगणक आहेत. संगणक प्रात्यक्षिक देणे सोपे जावे म्हणून प्रोजेक्टर ची सुद्धा व्यवस्था केली आहे.
संगणक अभ्यास क्रमात Paint, Wordpad, Ms Word, Powerpoint, Excel, Basic language, C Programming, Internet चा अभ्यास शिकवला जातो.
संगणक कक्ष
संगणक कक्ष