संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. गुरूनेच संगीताचे धडे द्यावे लागतात. गुरुकडून घेतलेल्या विद्येमुळे गायन कला उत्तमरीत्या साध्य होते. हा विचार घेऊनच प्रशालेमध्ये स्वतंत्र गायन विभागाची निर्मिती झाली.
गायन विभागासाठी स्वतंत्र हौल असून तो गायन हॅाल या नावाने संबोधला जातो. प्रशालेमध्ये गायनासाठी व तबल्यासाठी स्वतंत्र शिक्षक वृंद आहे. गायन वर्गाला स्थापने पासूनची अशी समृद्ध परंपरा आहे. फक्त संगीत विषयक कार्यच गायन वर्गात केले जाते. येथे पेटी, तबला, तंबोरा, दिलरुबा, कोंगो, ढोलक, सिंथेसाईजर अशी अनेक वाद्ये खूप पूर्वी पासून जतन केली आहेत. ज्याचा परिचय विद्यार्थीनीना गायन तासाला करून दिला जातो.
अभंग, भजन, सुगम संगीत, वाद्य संगीत, इ.स्पर्धा गायन वर्गात होतात. तसेच संगीत कार्यशाळा, वाद्य विषयक प्रात्यक्षिक इ. उपक्रम गायन वर्गात होतात. अनेक वाद्यांचा सराव व गीतांचा सराव विद्यार्थीनी केंंव्हाही गायन वर्गात येऊन करू शकतात व संगीताचा भरघोस आनंद प्राप्त करू शकतात.
सुसज्ज गायन वर्ग अनुभवी शिक्षक व संगीताची समृद्ध परम्परा ही प्रशालेची शान आहे. स्वतंत्र संगीत विभाग ही बाब इतर शाळामध्ये उपलब्ध नसते. परंतु स्वतंत्र गायन विभाग हे रेणुका स्वरूपचे वैशिष्ट्य आहे.