अभ्यासक्रमाबरोबर शिका Tally कोर्स ……
रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज मध्ये नेहमीच अभ्यासक्रमाबरोबरच भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर घडविण्यासाठी आवश्यक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. कॉमर्समध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींनी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच भविष्यामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी संगणकावर टॅलीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील उच्च शिक्षण हे रोजगार मिळवत पूर्ण करावे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कॉलेजच्या वेळेला जोडूनच रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स च्या माध्यमातून टॅलीचा कोर्स दिला आहे. सरकार मान्य असलेला हा टॅलीचा कोर्स सहा महिन्याचा आहे. सरकारी परीक्षा देऊन हा कोर्स पूर्ण करायचे निश्चित करण्यात आले. टॅलीचे सरकारी प्रमाणपत्र मिळवायचे असे ध्येय निश्चित केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स या संस्थेमध्ये संपूर्ण बॅच मध्ये टॅली कोर्ससाठी जागा शिल्लक होत्या. सर्वच्या सर्व जागा आपल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये कोर्स देऊन पूर्ण केल्या. विद्यार्थिनींनी कॉलेजचा अभ्यास सांभाळून कॉलेजच्या वेळेनंतर रोज एक तास टॅलीच्या कोर्ससाठी जास्तीचा वेळ दिला. २०२४-२५ या वर्षामध्ये आपल्या सरकारमान्य टॅली कोर्सचा १००% निकाल लागला आणि इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेबरोबरच सर्व विद्यार्थिनींनी सरकारमान्य टॅलीचा कोर्स पूर्ण करण्यात यश मिळविले. इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आणि टॅलीचा सरकारमान्य कोर्स करून सुट्टीमध्ये अकाउंटिंग चे काम करण्याचा मानस अनेक विद्यार्थिनींनी बोलून दाखवला. ज्युनिअर कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे उत्पन्न मिळविता मिळविता उच्च शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थिनींनी ठरविले. अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज हे एक वैशिष्ट्यपूर्ण कॉलेज असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकांनी आपल्या मनोगतात सांगितले.
आंतरमहाविद्यालयीन रिंगोस्टिक आणि रस्सी खेच स्पर्धा उपविजेतेपद
शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ या दिवशी म.ए.सो.सिनिअर कॉलेज आणि क्रीडा भारती, पुणे महानगर यांच्यूया संयुक्रत विद्यमाने कॉलनी, कोथरूड येथे आंतरमहाविद्यालयीन रिंगोस्टिक आणि रस्सी खेच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण ६० संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये आपल्या रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजने रस्सी खेच स्पर्धेत ३ रा क्रमांक तर रिंगोस्टिक स्पर्धेत २ रा व ३ रा क्रमांक मिळविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी जिगरबाज खेळ करत अनेक महाविद्यालयांच्या संघांना नमविले.
मिस रेणुका स्पर्धा
आज दिनांक ११ डिसेंबर २०२४ मंगळवार या दिवशी ज्यु. कॉलेज इयत्ता बारावी करीता मिस रेणुका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्रीमती उमा गोंधळेकर व श्रीमती श्वेता कुलकर्णी या लाभल्या होत्या.
भावे प्राथमिक सभागृहामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. इयत्ता बारावी अबोली मधील अवनी केळकर ही यावर्षीची मिस रेणुका स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थिनी सहभागी होत्या. प्रशालेच्या माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम या स्पर्धेला उपस्थित होत्या.
डिश डेकोरेशन स्पर्धा
दिनांक 10 डिसेंबर मंगळवार या दिवशी ज्यु. कॉलेजमधील इयत्ता 11वी व इ .12 वी करिता डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्रीमती स्मिता मांडके आणि अलका भांडगे या परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. इयत्ता 11 वी मधून प्रथम क्रमांक पल्लवी चिल्का व द्वितीय क्रमांक तनुजा धावडे व कोमल मार्कंडे आणि इयत्ता 12 वी मधून प्रथम क्रमांक तन्वी क्षीरसागर व द्वितीय क्रमांक दिव्या नगरे या विद्यार्थिनींचा आलेला आहे. स्पर्धेमध्ये एकूण 22 विद्यार्थिनींचा सहभाग होता. स्पर्धेकरिता माननीय मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम आणि माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम उपस्थित होत्या.
अर्थशास्त्रीय जत्रा २०२४-२५
दिनांक २७ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये इयत्ता १२वी च्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्रीय जत्रा संपन्न झाली. अर्थशास्त्रीय जत्रेचे यंदाचे हे १५ वे वर्ष आहे. दिनांक २७ नोव्हेंबर या जत्रेच्या पहिल्याच दिवशी माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून अर्थशास्त्रीय जत्रेचे उद्घाटन झाले.
त्यानंतर पोस्टर स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा पार पडली.
दिनांक २८ नोव्हेंबर या दिवशी पी पी टी स्पर्धा आणि संकल्पना नाट्य स्पर्धा झाल्या.
या अर्थशास्त्रीय जत्रेमध्ये एकूण ४२ पोस्टर, ४८ रांगोळ्या, ५ संकल्पना नाट्य, १५ व्हिडिओ आणि १४ PPT इत्यादींचे सादरीकरण झाले.
इयत्ता १२वी तील काही निवडक विद्यार्थिनींनी या जत्रेमध्ये सर्व विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे परीक्षण केले आणि त्याप्रमाणे गुणदान केले.
२८ नोव्हेंबर या दिवशी अर्थशास्त्रीय जत्रेचा सांगता समारंभ पार पडला. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनी, स्वयंसेवक व परीक्षक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मा. मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे आणि मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्रीय जत्रेसाठी सर्व विद्यार्थिनींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये भविष्यातील संधी तसेच बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, नियोजनाचे आणि प्रयत्नांचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले.
अर्थशास्त्रीय जत्रेत उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करून अर्थशास्त्रीय जत्रेची सांगता झाली. या जत्रेमध्ये इयत्ता अकरावी मधील १५ स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडल्या. यंदाचा अर्थशास्त्रीय जत्रेचा अनुभव हा विद्यार्थीनींसाठी आत्मविश्वास वाढविणारा ठरला.
ज्युनिअर कॉलेज कॅन्टीन उपक्रम २०२४
दिनांक २७ नोव्हेंबर बुधवार कॅन्टीन उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. दोन दिवसीय कॅन्टीन उपक्रम असून आजचा पहिला दिवस होता. इ.११ वी मधील विद्यार्थिनींचा सहभाग असतो. सँडविच इडली, समोसा, वडापाव इत्यादी पदार्थांची विक्री केल्या जाते. विद्यार्थिनींना मार्केटिंग स्किल प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यास मिळावे,व्यवसायाची सुरुवात करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो
याविषयीचे आकलन व्हावे या उद्देशाने कॅन्टीन उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
आज पहिल्या दिवसाच्या कॅन्टीन उपक्रमा च्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेच्या मा. उपमुख्याध्यापिका श्रीम.सविता हिले मॅडम या उपस्थित होत्या.
ऑनलाईन संविधान दिन कार्यक्रम
मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी घरघर संविधान हा इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद व इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख सौ हेमलता जगताप यांनी केले तर उद्देशिकाचे वाचन सौ ज्योती काळे मॅडम यांनी केले.
सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
आरी वर्क कार्यशाळा
स्वतः मधले कौशल्य ओळखून , त्या कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्याने अर्थाजन होऊ शकते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, उच्च माध्यमिक विभागामध्ये पंधरा दिवसाच्या आरी वर्क या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आरी वर्क हे एक नाजूक आकर्षक भरतकाम आहे. आजच्या फॅशनमध्ये हे खूप लोकप्रिय आहे. पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारच्या पोशाखांमध्ये आरी वर्कचा वापर वाढत आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनिंना भारतीय कलेचा समृद्ध वारसा याबद्दल माहिती मिळेल, तसेच त्या लवकरात लवकर स्वावलंबी बनतील. भविष्यामध्ये यातून त्यांना रोजगार निर्मिती होऊ शकते.
११वी स्वागत समारंभ
आज दिनांक २२/०८/२०२४ इयत्ता ११वी चा स्वागत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम व मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांनी सरस्वती पूजन केले. इयत्ता १२वी च्या विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना व मनोगत व्यक्त केले. इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी येवले ने सूत्रसंचालन केले तर श्रीमती हेमलता जगताप मॅडम यांनी प्रास्ताविक केले. मा. मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व स्वागत केले. इयत्ता १२वी ची विद्यार्थिनी प्रियंका माने हिने उपस्थितांचे आभार मानले..
११वी च्या सर्व विद्यार्थिनींना १२वी च्या विद्यार्थ्यांनी भेटकार्ड देऊन तसेच पेढा देऊन त्यांचे वर्गात स्वागत केले.
कॉमर्स डे
आज गुरुवार, दिनांक २२/०८/२४ ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवसीय कॉमर्स डे कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यानिमित्त प्राध्यापिका श्रीमती श्वेता कुलकर्णी यांचे कॉमर्स आणि उद्योजकता या विषयावर इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थीनींसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कॉमर्स च्या विद्यार्थिनींनी उद्योजक व्हावे आणि त्यासाठी पूर्वतयारी कशी करावी तसेच यशस्वी उद्योजकांची उदाहरणे देऊन विषय मांडणी केली. विद्यार्थिनींच्या मनात यानिमित्ताने उद्योजकतेचे बीजारोपण झाल्याचे निदर्शनास आले.
याप्रसंगी मा. मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे मॅडम उपस्थित होत्या. इयत्ता १२वी अबोली मधील समीक्षा राऊत हिने उपस्थितांचे स्वागत, परिचय करून आभार मानले.
कॉमर्स डे (२रा दिवस)
आज शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट२०२४, कॉमर्स डे चा दुसरा दिवस कॉमर्स विषयांशी निगडित प्रदर्शनीने साजरा करण्यात आला.
या प्रदर्शनामध्ये कॉमर्स मधील SP, OCM, ECONOMICS, BK&A/C, मराठी, ENGLISH इत्यादी विषयांवर आधारित इयत्ता १२वी च्या विद्यार्थिनींनी पोस्टर्स, मॉडेल्स, खेळ इत्यादी विविध प्रकार करून त्याचे सादरीकरण केले.
मा. मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे मॅडम, मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांच्या हस्ते फीत कापून व सरस्वती पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन दिसून आला.
ज्युनिअर कॉलेज माजी विद्यार्थिनी मेळावा २०२४
१५ ऑगस्ट २०२४ या दिवशी भावे प्राथमिक सभागृहामध्ये ‘माहेरवाशीण मेळावा’ म्हणजे माजी विद्यार्थिनी मेळावा आयोजित करण्यात आला होता. एकमेकांप्रती स्नेहभाव वृद्धींगत व्हावा, १९७५ ते २०२४ अशा विविध शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनी एकत्रित याव्यात, विद्यार्थिनीच्या कॉलेजविषयीच्या शिक्षकांविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा,कॉलेजविषयीचा कृतज्ञता भाव जागृत व्हावा या उद्देशाने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याकरीता ३०९ विद्यार्थिनी व ४ माजी शिक्षक उपस्थित होते. प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका, मा.उपमुख्याध्यापिका, मा. पर्यवेक्षक उपस्थित होते. ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी त्यांच्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.माजी शिक्षकांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थिनींविषयीचे विविध किस्से, आठवणी सांगितल्या.प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल माजी विद्यार्थिनींचे कौतुक केले. कृतज्ञता निधीबद्दल विद्यार्थिनींना आवाहन केले. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या मा.संगीता धावडे ( ज्यु.कॉलेज माजी विद्यार्थिनी) यांनीही त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणी सांगितल्या. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थिनींनी सेल्फी पॉईंटवर मैत्रिणींबरोबर,आजी-माजी शिक्षकांबरोबर फोटो काढले. अल्पोपहार,नावनोंदणी याचाही समावेश कार्यक्रमामध्ये करण्यात आला होता. स्वतःच्या वर्गखोलीत जाऊन तेथील बाकावर बसून विद्यार्थिनी गतकालीन आठवणीत रममाण झाल्या. इ.१२ वी मधील आजी विद्यार्थिनींनी फलकलेखन व रांगोळ्यांनी माजी विद्यार्थिनींचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सागर वाळके, प्रास्ताविक श्रीमती हेमलता जगताप व आभार प्रदर्शन श्रीमती श्वेता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाकरीता मा.मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे, मा. उपमुख्याध्यापिका सविता हिले, मा. पर्यवेक्षक जयसिंग जगताप, मा. पर्यवेक्षिका सुनिता गायकवाड उपस्थित होत्या.
इयत्ता १२ वी २०२४ निकाल १०० %


वीर सावरकर चित्रपट
विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यातील योगदानाची माहिती देणे, सावरकरांचे ब्रिटीश सरकार, क्रांतिकारक, अहिंसा, समता इत्यादींवर असलेल्या परखड मतांविषयी माहिती करून देणे, इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी देशासाठी केलेले सर्वस्वाचे बलिदानाची विद्यार्थिनींना माहिती देणे अशा उदात्त हेतूने ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता ११वी च्या १०५ विद्यार्थिनी व ५ शिक्षक अशा ११० जणांना वीर सावरकर चित्रपट दाखविण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
फेसबुकद्वारे या कार्यक्रमासाठी आर्थिक देणगीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत न्यूजर्सी, अमेरिका येथे वास्तव्य असलेले श्री श्रीकांत विनायक जोशी आणि श्रीमती मधुवंती जोशी यांनी विद्यार्थिनींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखविण्यासाठी आर्थिक देणगी दिली. वीर सावरकरांचे कार्य मुलींना समजले पाहिजे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली.
दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ८:०० वाजता डेक्कन सिटीप्राइड, पुणे येथे सदर चित्रपटाच्या विशेष शो चे नियोजन करण्यात आले होते. देशभक्तीने भारावलेल्या सर्वच विद्यार्थिनींना चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले होते.
चित्रपट संपल्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी वीर सावरकरांचे देशासाठी केलेले एवढे मोठे योगदान प्रथमच समजले अशी भावना व्यक्त केली.
अभ्यासक्रमाबरोबर शिका Tally कोर्स ……
रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज मध्ये नेहमीच अभ्यासक्रमाबरोबरच भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर घडविण्यासाठी आवश्यक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. कॉमर्समध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींनी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच भविष्यामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी संगणकावर टॅलीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील उच्च शिक्षण हे रोजगार मिळवत पूर्ण करावे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कॉलेजच्या वेळेला जोडूनच रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स च्या माध्यमातून टॅलीचा कोर्स दिला आहे. सरकार मान्य असलेला हा टॅलीचा कोर्स सहा महिन्याचा असून अकरावीच्या वर्षांमध्ये जानेवारी महिन्यापासून इयत्ता१२ वी च्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत हा कोर्स पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात सरकारी परीक्षा देऊन हा कोर्स पूर्ण करायचे निश्चित करण्यात आले. टॅलीचे सरकारी प्रमाणपत्र मिळवायचे असे ध्येय निश्चित केले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स या संस्थेमध्ये संपूर्ण बॅच मध्ये टॅली कोर्ससाठी जागा शिल्लक होत्या. सर्वच्या सर्व जागा आपल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये कोर्स देऊन पूर्ण केल्या. विद्यार्थिनींनी कॉलेजचा अभ्यास सांभाळून कॉलेजच्या वेळेनंतर रोज एक तास टॅलीच्या कोर्ससाठी जास्तीचा वेळ दिला. २०२३-२४ या वर्षामध्ये आपल्या सरकारमान्य टॅली कोर्सचा १००% निकाल लागला आणि इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेबरोबरच सर्व विद्यार्थिनींनी सरकारमान्य टॅलीचा कोर्स पूर्ण करण्यात यश मिळविले. रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजची टॅली कोर्सची पहिली बॅच या २०२३-२४ वर्षामध्ये यशस्वीरीत्या बाहेर पडली आहे. इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आणि टॅलीचा सरकारमान्य कोर्स करून सुट्टीमध्ये अकाउंटिंग चे काम करण्याचा मानस अनेक विद्यार्थिनींनी बोलून दाखवला. ज्युनिअर कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे उत्पन्न मिळविता मिळविता उच्च शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थिनींनी ठरविले. अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज हे एक वैशिष्ट्यपूर्ण कॉलेज असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकांनी आपल्या मनोगतात सांगितले.
जिल्हा परिषद स्पर्धेत रिद्धी ठाकूर चे यश
दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ जिल्हा परिषद आयोजित आंतरशालेय पिस्टल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या रेणुका स्वरूपच्या इयत्ता १२ वी मध्ये शिकणाऱ्या कु. रिद्धी ठाकूर या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये कु. रिद्धी ठाकूरने ४०० पैकी ३४५ गुण मिळविले. सदर स्पर्धेमध्ये कु. रिद्धी ठाकूरने सिल्वर मेडल मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.
रिद्धी आपल्या या यशाचे श्रेय प्राणायाम, नियमित सराव आणि कॉलेजकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देते.

*मतदार जनजागृती अभियान*
दिनांक 10 एप्रिल 2024 रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज, निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन तसेच स.प. महाविद्यालयाच्या चौकामध्ये मानवी साखळी, पथनाट्य अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार असो किंवा नियमित मतदान करणारे तसेच विविध कारणांमुळे मतदान न करू शकणारे मतदार डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविण्यात आले. रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम आणि अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्याने अभियान उत्तम पद्धतीने झाले. या प्रसंगी मा. मुख्याध्यापिका श्रीमती नाईक मॅडम, पर्यवेक्षक श्री जगताप सर, श्रीमती गायकवाड मॅडम उपस्थित होते. या अभियानात 215 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी मॅडम तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी नोडल अधिकारी श्री शरद मेमाणे सर उपस्थित होते. या विविध उपक्रमांद्वारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे व या दिवशी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे मतदान न करणे हे योग्य नाही, तसेच देशाच्या विकासामध्ये आणि पंतप्रधान यांच्या नियुक्तीसाठी मतदान करणे किती आवश्यक आहे, उद्याचा भारत आपणच घडविणार आहोत अशा पद्धतीने मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. प्रशालेतील सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी मतदान प्रतिज्ञा घेऊन सदर अभियानाची सांगता केली. सदर कार्यक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.



जुनियर कॉलेजला सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन
आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन या संस्थेस आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विविध माध्यमातून जे प्लास्टिक संकलित करून प्रदान केले होते, त्याबद्दल आपल्या जुनियर कॉलेजला सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन मिळाले आहे. या अभियानांतर्गत आपल्या ज्युनिअर कॉलेजने एकूण १५८ किलो प्लास्टिक हे रिसायकल करण्याकरिता या संस्थेस दिले होते. यामुळे ६५.४ किलो कार्बन आपण पर्यावरणात जाण्यापासून वाचविले आहे.
सर्वांचे अभिनंदन 



ज्युनिअर कॉलेज प्लॅस्टीक प्रदान कार्यक्रम
आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमधील सर्व विद्यार्थिनींनी गेले काही महिने समाजातील विविध घटकातून व तसेच स्वतःच्या घरातून संकलित केलेले प्लॅस्टीक कुशाग्र इनोवेशन्स फाउंडेशन या संस्थेला प्रदान करण्यात आले. प्लॅस्टीक प्रदान करण्यापूर्वी सर्व विद्यार्थिनींना सदर प्लॅस्टीकची प्रक्रिया, तसेच त्याचे विविधकरण, पुन:प्रक्रिया, पुन:वापर तसेच पुन:चक्रीकरण याबाबत कुशाग्र इनोवेशन फाउंडेशनचे संस्थापक सदस्य श्री आलोक गोगटे सर यांनी याबाबत माहिती दिली. प्लॅस्टीक बॉटल्स, प्लॅस्टीकच्या पिशव्या आणि प्लॅस्टीकचे कॅन व डबे यांचे वर्गीकरण करून आज साधारणपणे १७८ किलो प्लॅस्टीक प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. प्लॅस्टीक प्रदान कार्यक्रमास मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, इयत्ता ११ वी च्या विद्यार्थिनी आणि कुशाग्र इनोव्हेशन फाऊंडेशन चे संस्थापक सदस्य श्री आलोक गोगटे व संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

व्हेलेंटाईन डे आणि आपली संस्कृती व्याख्यान
आजच्या आधुनिक जगात १४ फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा होताना आपण बघत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीवर अशी अनेक पाश्चात्य वैचारिक आक्रमणे होत आहेत, म्हणूनच आजच्या किशोरवयीन तरुणांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महिला उत्थान मंडळ, पुणे सदस्य श्रीमती प्राणवी बोऱ्हाडे यांचे व्हेलेंटाईन डे आणि आपली संस्कृती या विषयावर इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान घेण्यात आले.
सदर व्याख्यानात वक्त्यांनी विद्यार्थिनींमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. भारतीय संस्कृतीचा वारसा, आपले दैनंदिन वर्तन, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाचे दुष्परिणाम, चारित्र्य संवर्धन आणि मातृ पितृ पूजन इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन केले.
व्हेलेंटाईन डे साजरा न करता आम्ही मातृ पितृ पूजन दिन साजरा करू असा संकल्प करून व्याख्यानाची सांगता झाली.
आंतरमहाविद्यालयीन रिंगोस्टीक स्पर्धा विजेतेपद २०२४
दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी झालेल्या म ए सो सिनिअर कॉलेज आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *आंतरमहाविद्यालयीन रिगोस्टिक स्पर्धेत* मुलींच्या गटात अत्यंत जिगरबाज आणि जबरदस्त खेळ करत सर्व संघांना पराभूत करून आपल्या रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज ने प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक मिळवले.
सर्व सहभागी विद्यार्थिनी, शिक्षक व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन





*इयत्ता १० वी वाणिज्य विभागातील संधी मार्गदर्शन :-*
आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ इयत्ता दहावीतील ज्या विद्यार्थिनींना कॉमर्स क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कोणत्या साईडला जायचे हे ठरविलेले नाही, अशा सर्व विद्यार्थिनींसाठी कॉमर्स शाखेमध्ये कशा पद्धतीने संधी आहे, तसेच आपल्या रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमध्ये कोणते कोणते उपक्रम, कार्यक्रम, कोर्सेस आणि अभ्यासक्रम चालतो या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली. त्यासंदर्भामध्ये सुरुवातीला श्रीमती हेमलता जगताप मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर श्री सागर वाळके सर यांनी रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज संदर्भात माहिती देणारे पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. सादरीकरणानंतर अनेक विद्यार्थिनींच्या शंकांना उत्तरे देण्यात आली.
*अर्थशास्त्रीय जत्रा 2023-24*
दिनांक 14 डिसेंबर 2023 आणि 15 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्रीय जत्रा संपन्न झाली. अर्थशास्त्री जत्रेचे यंदाचे हे १३ वे वर्ष आहे. दिनांक 14 डिसेंबर 2023 या दिवशी माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून अर्थशास्त्रीय जत्रेचे उद्घाटन झाले.
त्यानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा पार पडली. दिनांक 15 डिसेंबर 2023 या दिवशी पोस्टर स्पर्धा आणि संकल्पना नाट्य स्पर्धा पार पडली. या अर्थशास्त्रीय जत्रेमध्ये एकूण 71 पोस्टर, 59 रांगोळ्या, 7 संकल्पना नाट्य, 9 व्हिडिओ आणि 23 PPT इत्यादींचे सादरीकरण झाले. इयत्ता बारावीतील काही निवडक विद्यार्थिनींनी या जत्रेमध्ये सर्व विद्यार्थिनींचे परीक्षण केले आणि त्याप्रमाणे गुणदान केले. 15 डिसेंबर 2023 या दिवशी अर्थशास्त्रीय जत्रेचा सांगता समारंभ पार पडला. या सांगता समारंभामध्ये अर्थशास्त्रीय जत्रेच्या व्यवस्था प्रमुख विद्यार्थिनी आणि श्री वाळके सर यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच प्राध्यापक श्री सागर वाळके सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्रीय जत्रेसाठी सर्व विद्यार्थिनींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये भविष्यातील संधी आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल कशी करावी तसेच बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, नियोजनाचे आणि प्रयत्नांचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले. अर्थशास्त्रीय जत्रेत उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करून अर्थशास्त्रीय जत्रेची सांगता झाली. या जत्रेमध्ये इयत्ता अकरावी मधील 29 स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडल्या. यंदाचा अर्थशास्त्रीय जत्रेचा अनुभव हा विद्यार्थीनींसाठी आत्मविश्वास वाढविणारा ठरला.
रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभाग *क्रीडा स्पर्धा 2023-24*
९ डिसेंबर २०२३ शनिवार या दिवशी उच्च माध्यमिक विभागात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्रीडा महोत्सवात मा.मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक मॅडम मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम, मा.पर्यवेक्षक श्रीमती सुनिता गायकवाड मॅडम, मा.पर्यवेक्षक श्री. जयसिंग जगताप सर उपस्थित होते. मा.मुख्याध्यापिका यांनी झांज वाजवून या स्पर्धेची सुरुवात केली.
स्पर्धेमध्ये डॉजबॉल, रिंगोस्टीक आणि रिले इ.खेळाचा समावेश होता.११ वी व इ.१२ वी मधून एकूण १९६ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.
सदर स्पर्धेमध्ये इ १२ वी अबोली चा रिंगोस्टीक स्पर्धेत प्रथम क्रमांक तर इ.१२ वी गुलाब या वर्गाने डॉजबॉल व रिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांनी विजेत्या संघाला फिरती ढाल देऊन कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या जीवनातील व्यायाम, खेळ तसेच प्राणायाम याचे उत्तम आरोग्यासाठी असलेले महत्व विशद केले. यावर्षीच्या स्नेहसंमेलन कार्यवाह श्रीमती मनीषा साळुंके यांनी स्नेहसंमेलनातील आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. भारतमातेच्या जयजयकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

मिस रेणुका स्पर्धा
दिनांक 12/12/2023 या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागात स्नेहसंमेलन 2023-24 या अंतर्गत ‘ *मिस रेणुका’* ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये इ. 12वी अबोली व गुलाब मधील एकूण 30 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. इ. 12वी अबोली मधील कुमारी रिद्धी ठाकूर ही या स्पर्धेत विजेती झाली. सदर स्पर्धेचे परीक्षण श्रीम. बनकर मॅडम व जु. कॉलेज विभाग प्रमुख श्रीमती हेमलता जगताप यांनी केले. यात विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान ,विषय ज्ञान व प्रासंगिक ज्ञान यावर आधारित तीन फेऱ्यांमध्ये प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेच्या नियोजन व आयोजनात प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक ,माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले ,माननीय पर्यवेक्षिका श्रीमती सुनिता गायकवाड व पर्यवेक्षक श्री जगताप सर यांनी मार्गदर्शन केले . खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
खाद्य महोत्सव
दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 हा कालावधी मध्ये ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी *’खाद्य महोत्सव*’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . या उपक्रमात इयत्ता अकरावीतील एकूण 40 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या अंतर्गत विद्यार्थिनींना मार्केट सर्व्हे म्हणजे काय? वस्तूचे मार्केटिंग कसे करावे? पदार्थाची किंमत ठरविताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो? जाहिरातीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो ? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. सँडविच, वडापाव, समोसा व इडली याचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले. प्रत्येक स्टॉलवर तीन विद्यार्थिनींचा एक गट असे गट करण्यात आले. सकाळी 8:00 ते 11:00 या कालावधीत पदार्थांची विक्री करण्यात आली. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीसह शाळेतील विद्यार्थिनींनी सुद्धा पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. नफ्या बरोबरच व्यवसायात ग्राहकांचे समाधान हे खूप महत्त्वाचे असते. हे विद्यार्थीनीना मनापासून पटले. या उपक्रमातून अनेक विद्यार्थिनींमध्ये आपणही उद्योजक होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला.

वाणिज्य दिवस
रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य दिन साजरा…. महाराष्ट्र टाईम्स मध्ये बातमी…..
सोमवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य दिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थिनींना वाणिज्य विषयातील अवघड व क्लिष्ट संकल्पना सोप्या व्हाव्या, वाणिज्य विषयातील नवनवीन संधी व वाटा कळाव्यात,विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा,सहकार्य भावना वाढीस लागावी याकरिता वाणिज्य विषयातील विविध घटकांवर चार्ट व मॉडेल विद्यार्थिनींनी तयार केले.
तसेच वाणिज्य दिनाच्या निमित्ताने श्री. भगवान पांडेकर सरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वाणिज्य विषयातील व्यावसायिक व नोकरी विषयक संधी, वाणिज्य विषयातील विविध स्पर्धा परीक्षा, इ.12 वी नंतर विविध डिग्री व डिप्लोमा कोर्स इ. विषयक मार्गदर्शन सरांनी केले.
प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वैष्णवी थोरात तर सूत्रसंचालन व परिचय कु. नेहा भापसेकर हिने केले. कु. आकांक्षा पाटोळे हिने मान्यवरांचे आभार मानले.
व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम व्याख्यान
दिनांक १४ जुलै २०२३, उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनींशी पुणे पोलीस नार्कोटिक्स विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर घोरपडे आणि औंध हॉस्पिटल येथे कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मोहिनी सुरवसे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. सामाजात व्यसनासंदर्भात घडणाऱ्या चुकीच्या घटनांना कसे कमी करता येईल, व्यसने कोणत्या प्रकारची असतात, आपल्याला एखादे व्यसन असल्यास ते लपवून न ठेवता शिक्षक व पालकांशी संवाद साधून कसे कमी करता येईल, व्यसनांमुळे मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे व्यसन कसे कमी करता येईल इत्यादी विषयांवर PPT सादरीकरण करून चर्चा करण्यात आली.
व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता उत्तम आरोग्य ठेवून सक्षम भारत निर्माण करण्याचा निर्धार सर्व विद्यार्थिनींनी व्यक्त केला.
सुरक्षा व दामिनी पथक व्याख्यान
दिनांक ३ जुलै २०२३, उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता १२ वी च्या वर्गात पुणे पोलीस विभागातील दामिन पथकाच्या महिला पोलिसांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. सामाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांना कसे सामोरे जावे, मित्र मैत्रिणींशी कसे संबंध असावेत, आपल्या मर्यादा पाळणे कसे आवश्यक आहे, सामाजिक माध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, आपल्या पालकांशी नेहमी संवाद साधणे कसे गरजेचे आहे इत्यादी विविध मुद्यांवर संवाद साधला.
आपत्कालीन परिस्थितीत १००, ११२ या नंबर वर फोन केल्यास महिला दामिनी पथक आपल्या मदतीला कोठेही धावून येऊ शकते. आपण प्रसंगाचे भान ठेवून न घाबरता आत्मविश्वासाने संकटाला सामोरे गेले पाहिजे असा विश्वास दामिनी पथकाने विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला.